Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश नेल्लोर येथे कोरोना चे औषध घेण्यासाठी गर्दी

Published Categorized as Knowledge, Health

Nellore Covid Medicine आंध्रप्रदेश मधील नेल्लोर मध्ये हे औषध घेण्यासाठी लोकांनी केली प्रचंड गर्दी 

कोरोना सारख्या त्रासदायक आजाराला लोक कंटाळले आहेत.

या आजारा पासून मुक्ती मिळवण्यासाठी लोक वाट्टेल ते करायला आणि कुठल्याही औषधावर विश्वास ठेवायला तयार झालेत. 

कोणी गोमूत्र पिण्यास सांगितले तरी लोक त्यावर विश्वास ठेवत आहेत आणि करण्यास तयार आहेत लोक जादू टोण्यासारख्या आंध्रश्रद्धेला बळी पडत आहेत. 

Nellore Covid Medicine

असाच एक प्रयत्न आंध्र प्रदेश मध्ये केला जातोय पाहूया ते काय आहे. 

आंध्रप्रदेश मधील नेल्लोर जिल्ह्यातील एक छोट्या गावात कोरोना वरील औषध मिळत आहे. यासाठी लोक खूप गर्दी करत आहेत.

आजूबाजूंच्या ईतर गावातील लांबून आलेले लोकही लाईने लावत वाट पाहत आहेत. 

हे औषध एका आनंदैया या आयुर्वेदिक चकित्सक यांनी तयार केले असून या औषधाणे कोरोना ठीक होतो असा दावा केला आहे.

त्याचे हे Nellore Covid Medicine औषध सोशल मेडियावर व्हायरल होत आहे. याची दखल abp न्यूज यांनीही घेतली. यामुळेच ईतर गावतूनच नाही तर दुसऱ्या राज्यातील लोकही हे औषध घेण्यासाठी गर्दी करत आहेत. 

आत्ता पर्यन्त या औषधाला असे कुठलेही वैज्ञानिक प्रमाण मिळाले नाही की हे औषध कोरोनावर खात्रीशीर इलाज करू शकेल.

तरी लोक यावर विश्वास ठेवून हे औषध घेण्यासाठी दूरवरून येत आहेत. 

मोफत दिले जात आहे औषध 

आनंदैया या नेल्लोर आयुर्वेदिक चिकित्सकाणे लोकाना हे औषध बिलकुल फ्री देत आहेत. ज्यांची परिस्थिति कोरोनामुळे गंभीर आहे त्यांना आईड्रॉप देण्यात येत आहे.

या औषधा ला अजून तरी वैज्ञानिक असे कुठलेच प्रमाण मिळालेले नाही तरी या औषधा साठी लोकानी खूप गर्दी केलेली दिसून येतीय.

प्रशासनाने या औषधावर सध्या तरी पाबंदी लागलेली दिसते. 

येथे आलेल्या काही लोकानी या औषधा बद्दल बोलतानी सांगितले की बाहेरची दवाखान्याची परिस्थिती पाहून लोकाना आपले प्राण गमवावे लागत आहे.

या पेक्षा ही औषध नक्कीच Nellore Covid Medicine कोरोनावर काम करेल असे सांगितले. 

काही मेडिया रिपोर्टर यांच्या म्हणया नुसार प्रशासनाने परिस्थिति नुसार औषधाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

आयुष आयुर्वेदचे डॉक्टर औषधाची पडताळणी करत आहेत जर याचे परिणाम सकारात्मक आले तर या औषधावर काही तरी निर्णय घेतला जाईल.

Avatar of Geeta P

By Geeta P

i am Full Time blogger, i am Mehandi Artist, i like to write articles on Health and History topic

Leave a comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.