कोरोना पासून बचावासाठी आयुष मंत्रालयाने सूचवलेला या सूचना

by Geeta P
241 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोना व्हायरसचा धोका दिवस दिवस वाढतच आहे. कोरोना रुग्णांच्या संखेत वाढ होत चाललेली आहे. कोरोना चा धोका टाळण्यासाठी आपण आपली प्रतिकार शक्ती वाढवणे अधिक महत्त्वाचे ठरते.

navodayatimes.in

यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि या विषाणू पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. आणि काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. सेल्फकेअर गाईडलाईन्स म्हणजे स्वतःची काळजी घेण्या बाबत आयुष मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.

तसेच वेगवेगळ्या आजारांपासून आणि श्वास संबंधी रोगांपासून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाने काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरसमज लोकांना होऊ नये किंवा त्यांच्या मध्ये कुठलाही चुकीचा समज होऊ नये यासाठी आयुष मंत्रालयाने काही आयुर्वेदिक टीप्स सांगितलेले आहेत त्या खालील प्रमाणे. 

  • संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त कोमट पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा
  • रोज दिवसातून कमीत कमी तीस मिनिट तरी व्यायाम, योग साधना किंवा योगासन अवश्य करावेत
  • धने, जिरे, हळद, लवंग तसेच लसूण या पदार्थांचा आहारात समावेश करावा
  • सकाळी उठल्यास एक चमचा च्यवनप्राश खाऊनच दिवसाची सुरुवात करावी
  • मधुमेह असणाऱ्यांनी शुगर फ्री चवनप्राश खावे
  • त्याचबरोबर चहा मध्ये आलं आणि लवंग घालून चहा घ्यावा
  • दिवसातून एकदा तरी हर्बल टी किंवा काढा घ्यावा 
  • काढा बनवण्यासाठी तुळस, हळद, दालचिनी, काळी मिरी, आलं आणि गूळ पाण्यात एकत्र उकळून ते गाळून हा काढा प्यावा
  • हळद घातलेले दूध पिनेही फायदेशीर ठरेलनारळाचं तेल किंवा देशी गाईचा तुपाचे दोन दोन थेंब आपल्या नाकात सोडावे
financialexpress.com

ही माहिती देशातील आयुर्वेदाचार्य कडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेनुसार किंवा सोयी प्रमाणे यांचा वापर करावा बदलत्या हवामाना नुसार होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांशी लढण्यासाठी हे वरील उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने चालू करण्यास सांगितला आहे तसेच कोरोंनाचा चा प्रसार रोखण्या साठी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून त्या सूचनांचे पालन करण्याचे असा सल्ला दिला गेला आहे.

Related Posts

Leave a Comment