Matsya Mata Mandir मंदिरात व्हेल माशाच्या हाडची पूजा केली जाते

459 views
Matsya Mata Mandir

Matsya Mata Mandir मत्स्य माताजी मंदिर या मंदिरात एका मंदिरात माशाच्या हाडांची पूजा केली जाते.

भारतीय संस्कृती परंपरा जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याच बरोबर भारतातील प्रत्येक मंदिर आणि त्या मंदिराचा इतिहास असतो.

काही मंदिरे इतके श्रीमंत आहेत की आपण कधी कल्पनाच करू शकत नाही. काही दिवसांपूर्वी सर्वांनी बातम्यां मध्ये बघितले असेल.

पद्मनाभस्वामी मंदिर आणि त्या मंदिरामध्ये दडलेला खजिना.

या मंदिरावर बऱ्याच डॉक्युमेंटरी तयार झालेल्या आहेत. असे भारतामध्ये अनेक मंदिरे आहेत. आणि प्रत्येक मंदिराचे एक रहस्य आहे.

आणि त्याच बरोबर ह्या मंदिराला काही ना काही इतिहास जरूर असत.

आज आपण अशाच एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. या मंदिरामध्ये चक्क एका माशाची पूजा केली जाते.

जसे आपण गणपतीच्या मंदिरा मध्ये गणपतीचे वाहन उंदराची पूजा करतो. नागपंचमीला नागाची पूजा करतो.

धर्मामध्ये विविध तिथीला वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा केली जाते. पण आज आम्ही सांगणार आहोत एका अशा मंदिरा बद्दल त्या मंदिरात माशाच्या हाडांची पूजा केली जाते. Matsya Mata Mandir 

Dirgheshwar Nath Mandir दीर्घायुष्य देणाऱ्या मंदिराची कहाणी

मत्स्य माताजी मंदिर ( Matsya Mata Mandir )

हे मंदिर गुजरात राज्यातील वलसाड तालुक् यांमध्ये मागोद डुंगरी या गावामध्ये आहे.

हे मत्स्य माताजी मंदिर Matsya Mata Mandir म्हणून प्रसिद्ध आहे.

मत्स्य माताजी मंदिर 300 वर्ष जुन आहे. हे मंदिर तेथील कोळी समाजातील लोकांनी बांधलेलं आहे. मत्स्य माताजी मंदिरा बद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. 

या गावामध्ये प्रभु टंडेल नावाचा एक कोळी राहत होता. त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये एक मोठा व्हेल मासा समुद्र किनाऱ्यावरती मृतावस्थेत सापडला आहे.

आणि त्या माशाच्या रूपांमध्ये एक देवी प्रवास करत आहे. परंतु समुद्र किनारी आल्यास त्याचा मृत्यू होतो. नंतर तो खडबडून जागी झाला.

आणि जवळच असलेल्या समुद्र किनारी जाऊन बघतो तर खरच एक वेल मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत पडला होता. 

बघण्यासाठी आलेल्या ग्रामस्थांना त्यांनी त्याला पडलेले स्वप्न सांगितल्या नंतर त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि या मंदिरात ची स्थापना केली. 

मत्स्य माताजी मंदिराचे ( Matsya Mata Mandir ) बांधकाम होत असताना त्या मृत माशाला प्रभु टंडेल कोळ्या ने जमिनी मध्ये पुरून ठेवलं होतं. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या माशाचे हाडे मंदिरात स्थापन केले.

आणि त्या मंदिरात पूजा-अर्चा होऊ लागली. परंतु काही गावकऱ्यांना ते पटलेलं नव्हतं. त्यांनी त्याला विरोध केला. 

काही काळा नंतर या गावांमध्ये महामारी आली. गावातील लोक या आजाराने खूप त्रस्त झाले होते. नंतर त्या कोळ्याने त्या मत्स्य माताजी मंदिरामध्ये जाऊन नवस केला.

या गावाला या रोगातून लवकर मुक्त कर. आणि आश्चर्य म्हणजे भक्तांच्या नवसाला देवी पावली आणि हे संपूर्ण गाव रोगमुक्त झालं.

तेव्हापासून सर्व गावकरी या मंदिरात येऊन पूजाअर्चा करू लागले. 

त्या काळापासून मत्स्य माताजी मंदिर Matsya Mata Mandir खूप प्रसिद्ध झालेला आहे. तेव्हापासून मत्स्य माताजी मंदिर टंडेल परिवार सांभाळत आहे.

दरवर्षी या मंदिरात जत्रा भरली जाते. 

Related Posts

2 comments

SANDIPAN KARDE 28/07/2020 - 2:07 pm

Jai matsya mataji

Reply
डोम कावळा 28/07/2020 - 2:11 pm

🙏

Reply

Leave a Comment