Markus Rex अंटार्क्टिका हिमनग विरघळून होईल जग बुडी

by Geeta P
335 views
Markus Rex

Markus Rex वैज्ञानीक प्राद्यापक मार्क्स रेक्स अंटार्क्टिका हिमनग पूर्ण विरघळून होईल जग बुडी अशी भीतीदायक माहिती वैज्ञानीकानि दिली.

जग हे खूप झपाट्याने पुढे जात आहे.  त्यामुळे हवेतील प्रदूषण खूप वाढले आहे.  ग्लोबल वॉर्मिंग मुळे होणारे नुकसान आता टाळता न येण्यासारखे आहे.  

आता हे नुकसान आशा पातळीवर येऊन पोहचले आहे ज्याला पुनः पूर्वरत करता येणे शक्य नाही. 

आता आपल्याला या अश्याच बदला सोबत जगावे लागणार असे विधान वैज्ञानीक प्राद्यापक मार्क्स रेक्स Markus Rex यांनी केले आहे.  

आतापर्यन्तच्या सर्वत मोट्या आर्क्टिक महासागराच्या मोहिमेचे (arctic expedition) आयोजन प्राध्यापक मार्क्स रेक्स Markus Rex यानीच केलेले आहे. 

समुद्रातील अति गर्मी मुळे बर्फ वितळेल.  

प्राध्यापक मार्क्स रेक्स  Markus Rex यांच्या म्हणया नुसार आर्क्टिक महासागरातील उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही ग्लोबल वॉर्मिंग चे खूप मोठे नुकसान आहे. 

Markus Rex
Markus Rex

त्यांच्या म्हणण्या नुसार येणाऱ्या काही दशकात समुद्रातील वाढत्या तापमानामुळे आणि उष्ण वातावरणमुळे समुद्रातील बर्फ असाच गायब होईल.  सर्व जीव सृष्टीला याचा धोका आहे.  

Professor Markus Rex यांनी उत्तर ध्रुवावरील (north pole )आतापर्यन्तच्या सर्वात मोठ्या मोहिमेचे नेतृत्व केले आहे.  

ही सर्वात मोठे मोहीम असून यात २० देशातील तब्बल ३०० वैज्ञानिकानी या शोध मोहिमेत सहभाग घेतला होता.  

हा प्रवास बऱ्याच दिवस म्हणजे ३८९ दिवस चालला आणि ते सगळे गेल्या अक्टोबर मध्ये जर्मनीला परत आले आहेत. 

या मोहिम प्रवासाठी १० अब्ज रुपये खर्च झाले 

वैज्ञानिकाना ही उत्तर ध्रुवाची(north pole ) मोहीम करत असताना अनेक धोकादायक माहिती काही पुरावे मिळाले.  

या पुराव्या वरून असे सिद्ध झाले की काहीच दशकात आर्क्टिक मधील हिमनग पूर्ण पणे विरघळतील.

आर्क्टिक महासागरातील बर्फ गायब होण्यास सुरवात होईल. 

शोध घेत असताना या मोहिमे ने आपल्या सोबत या शोधाशी संबधित १५० टेराबाईट डेटा आणि बर्फाचे एक हजाराहून अधिक नमुने आपल्या सोबत आणले आहेत.  

ग्लोबल वॉर्मिंग मुळे होणाऱ्या नुकसानाचे परिणाम शोधण्यासाठीच्या या मोहिमेवर १४० मिनीयन युरो (१६५ दसलक्ष डॉलर्स किंवा १० अरबहून अधिक रुपये ) ईतका मोठा खर्च झालेला आहे.

Markus Rex वैज्ञानिकांच्या म्हणण्या नुसार २०२० मध्ये सर्वात मोठे नुकसान 

शास्त्रज्ञाच्या म्हणण्या नुसार आर्क्टिक महासागरातील बर्फाच्या पातळीत २०२० मध्ये वसंत ऋतुत सर्वाधिक घट झाली.  

म्हणजे ईतक्या वर्षात आतापर्यन्तच्या काळात समुद्रात बर्फ निर्माण होण्याचे प्रमाण कमी झाल्याची नोंद झाली आहे.  

या नोंदी नुसार २०२० मध्ये उन्हाळ्यात बर्फ कमी झाला आहे. 

Wuhan and Indian Scientists पुणेकर दांपत्याने वेधलं जगाचं लक्ष

या उन्हाळ्यात आर्क्टिक महासागरातील बर्फ गेल्या दशकान पेक्षा अर्ध्याच झाला आहे असे मार्क्स यांनी सांगितले. 

अशीच जर परिस्थिति राहिली तर सर्व जगाला याचा खूप मोठा धोका संभवेल.

आम्हाला इंस्टाग्राम Follow करा

Related Posts

Leave a Comment