दोन भावंडांनी सोशल मीडियावर धमाल केली आहे,त्यांच्या विषयी थोडेसे

342 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

सोशल मीडिया मध्ये जगातील सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते. सामान्य व्यक्ती पासून ते सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाचा वापर करतात, यामुळे काही एका रात्रीत लोकप्रिय झाले. अशाच माध्यमातून काही दिवसांपूर्वी राणू मंडळ रातोरात सोशल मीडियावर फेमस झाली, नंतर तीच काय झाले ती गोष्ट वेगळी आहे म्हणा. 

सध्या असाच दोन निरागस मुलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना, त्यांच्या या गाण्याने अखं सोशल मीडिया गाजवल. त्यांच्या आवाजातील आवाजाचा निरागस पणा आणि मुख्य म्हणजे त्यांचे पाठांतर, यांचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर खूप सध्या गाजत आहेत त्यामुळे सर्वांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता ताणलेली आहे. 

आम्ही आज तुम्हाला त्या दोन निरागस भावंडा विषयी सांगणार आहोत. एक यूट्यूब चैनल आहे त्या यूट्यूब चैनल वरती त्यांनी त्यांचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मंजेश्वर ब्रदर्स या नावाने त्यांचे युट्यूब व्हिडिओ चॅनल सध्या खूप गाजत आहे, हे निरागस दोन मुलं ऑस्ट्रेलिया मेलबर्न मधील राहणारे भावंड आहेत मोठ्या मुलाचे नाव अर्जुन आणि छोटा आरव त्या दोघांचा जन्म ऑस्ट्रेलिया मध्ये झालेला आहे, आणि याच कारणामुळे त्यांचं मराठी थोडसं कच्चं आहे परंतु त्यांना मराठी आणि हिंदी गाण्यांची प्रचंड आवड आहे, या लॉकडाउनच्या काळा मध्ये त्यांची गाणी त्यांच्या वडिलांनी म्हणजे अमेय मंजेश्वर यांनी मोबाईल मध्ये रेकॉर्ड केली आणि त्यांनी एक यूट्यूब चॅनल चालू केलं, चॅनला नाव दिलं  मंजेश्वर ब्रदर्स, आणि बघता बघता या मुलांवर कौतुकाचा वर्षाव झाला आणि त्यांचे यूट्यूब चैनल प्रचंड गाजू लागलं. 

त्यांची अशीच प्रगती पुढे चालू राहो, डोमकावळा टीम तर्फे शुभेच्छा

Related Posts

Leave a Comment