गुरूवार, जून 24

या ११ वर्षाच्या मुलीने लिंबूपाण्यातून ७० कोटी रुपये कमावले.

मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं म्हटलं जातं, आणि या मुलांच्या मनामध्ये विविध कल्पना येत असतात, काय कल्पना भीतिदायक असतात तर काही कल्पना आल्हाददायक असतात, आणि हेच लहान मुलं कमी वयामध्ये ज्या मोठ्या कामगिरी करतात ते भल्या मोठ्या मोठ्या लोकांना ही जमत नाही, लोक कशा मधून कमाई करतील हे काही सांगता येत नाही, परंतु लहान मुलं सुद्धा कशा मधून पैसा कमावतील हे सांगता येत नाही, जेव्हा खेळायचं बघायचं असतं त्या वयामध्ये ही लहान मंडळी पैशाची कमाई करतात. आज आम्ही अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, अकरा वर्षाच्या लहान मुलीने, लिंबू सरबता मधून सत्तर कोटी रुपये कमावले, बसला ना धक्का? होय पण ही गोष्ट खरी आहे.

ही गोष्ट आहे अमेरिकेमधील टेक्सास मध्ये राहणाऱ्या अकरा वर्षीय मिकाइला उल्मेर ची, लहानपणी तिला मधमाशीने चावा घेतला, नंतर तिच्या मनामध्ये मधमाशांना विषयी खूप भीती निर्माण झाली, आणि काही दिवसांनंतर कुतूहलही ही निर्माण झालं. मिकाइला नंतर मधमाशांनी विषयी माहिती गोळा करू लागली, त्यावर तिथे प्रचंड असा शोध घेतला, विविध प्रकारचे मध आणि त्याची चव यावर तिने संशोधन केले. तिच्या घरांमध्ये परंपरागत लेमनेड व्यापार होता. त्यामध्ये तिने थोडे धने आणि मध मिसळला, त्याची चव एकदम चांगली लागू लागली. आणि हे पेय लोकांना भयंकर आवडलं, नंतर तिच्या डोक्यामध्ये हे पेय विकण्याची कल्पना आली.

त्यानंतर तिने स्थानिक एबीसी टीव्हीच्या एका कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. ज्या कार्यक्रमामध्ये बिझनेसच्या आयडिया वरती पैसे जिंकण्याची संधी मिळते, आणि तिने ती संधी गमावली नाही, तिला सात हजार डॉलरची फंडिंग मिळाली, मग काय मग तिने आपला व्यवसाय चालू केला. एवढ्यावरच थांबली नाही तर तिने बराक ओबामा यांना सुद्धा आपल्या लेमनेड ची चव चाखायला लावली, आणि त्यांनाही त्याची तो भयंकर आवडली. 

कालांतराने तिने होल फूड स्टोर सोबत लेमनेड ब्रँडचा विक्रीचा करार केला. आणि त्या बदल्यात तिला सत्तर कोटी रुपये मिळाले. तीच बी स्वीट नावाचं पेय आता अमेरिकेमध्ये खुप प्रसिद्ध आहे. 

मधमाशांनी तिचे जीवन एकदम बदलून टाकलं आणि तिला कोट्याधिष बनवलं

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.