श्रीमंतांना ही लाजवेल अशी आजीबाईंची कोरोना ग्रस्तांना मदत

267 views

जगामध्ये उद्भवलेल्या कोरोंना च्या या कठीण प्रसंगी प्रत्येक जणु माणुसकीची दर्शन घडवत आहे, भारतामध्ये मोठ्या उद्योग पतींनी भली मोठी मदत देऊ केली,  सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये हातभार लावलाय फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी ना थोडी मदत भारतातील कार्यासाठी दिली.पण आज आम्ही एका अशा आजीबाई ची गोष्ट सांगणार आहेत ती तुम्हाला थक्क करेल,  कारण या आजी बाईला पेन्शन म्हणून फक्त सहाशे रुपये दरमहा येते,  आणि त्या आजी बाईने पाचशे रुपये मदत म्हणून करून ग्रस्तांसाठी दिली. 

ही गोष्ट आहे मैसूर मधल्या 70 वर्षीय कमलम्मा आजींची, या आजी लोकांच्या घरी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात परंतु या कोरोंना च्या कठिण काळा मध्ये ते पण काम नसल्यामुळे त्यांना येणाऱ्या पेन्शनवर उदरनिर्वाह करण्याची वेळ आली आहे. म्हैसूर रोटरी क्लब येथील गोरगरिबांना मदत नेहमीच करत असते आणि या काळा-मध्ये हे अन्नाची पाकिटे तिथल्या लोकांना वाटले आहेत, त्याच रोटरी क्लबच्या एका सदस्याने सांगितले की ती आजी त्यांच्याकडे आली पण सुरुवातीला वाटले आमच्याकडे अन्न मागण्यासाठी आले असेल पण नंतर त्या आजीबाईने पाचशे रुपये काढून त्यांच्याजवळ दिले. मी त्यांना सांगितले की हे पैसे तुमच्याजवळ ठेवा पण त्या आजीबाई चे उत्तर खूप मोठे होते, त्या म्हणाल्या एक महिनाभर बघते मी तुम्ही खूप लोकांसाठी  खूप  मेहनत घेतात, यामध्ये आपणही हातभार लावावा म्हणून ही छोटीशी मदत मी तुम्हाला देत आहे कृपया ती घ्या नाही म्हणू नका. सध्या सर्व समाज माध्यमांवर या अजुन बाईंचे चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर आहे kamalamma donation

हा तिच्या कमाईचा 90 टक्के भाग होता.  मोठ्या धनिक लोकांनी दिलेली ती मदत आणि या आजीबाईंची मदत जर तुलना केली तर आजीबाईचा पारडं जड आहे.

Related Posts

Leave a Comment