काय होईल जर ८० गुरु ग्रह एकत्र आले तर ?

285 views

गुरु ग्रहाचे वजन आपल्या सौरमंडळातल्या सर्व ग्रहांच्या दुप्पट आहे. याला काही ठोस जमीन नाही, गुरु ग्रह त्याच गोष्टी पासून बनला आहे जो की आपला सूर्य बनला आहे, तरी पण तो काहीच तारा नाही आहे. गुरु ग्रह एवढं वजन नाही आहे की त्याच्या कोर मध्ये फ्युजनप्रक्रिया चालू होईल. आणि ताऱ्यांच्या समूहांमध्ये गुरू ग्रहाला सामील होण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत, याच कारणामुळे गुरु ग्रह असून तो तारा नाही. 

जर आपण 79 गुरु ग्रह जोडून एक ग्रह बनवला तर तरच आपण या ग्रहाला तारा म्हणू शकतो. आणि जर असं झालं तर काय होईल ?

तर जाणून घेऊयात गुरु ग्रहाचे एका मोठ्या तार्‍यांमध्ये रूपांतर झाले तर काय होईल?

८० गुरु ग्रह एकत्र आले तर हे सगळे गॅसचे ग्रह एका मोठ्या ताऱ्यांमध्ये रुपांतरीत होतील. असे झाले तरीपण हा तारा आपल्या सूर्यासारखा कधीच बनू शकत नाही. हा ग्रह इतका मोठा होईल तो दुरून हायड्रोजनचा एक जळता मोठा तारा दिसेल. परंतु हा सूर्यासारखा तेजस्वी नाही दिसणार. आणि याचा पृथ्वीवर काही जास्त परिणाम होणार नाही कारण सूर्य पासून ते जे अंतर आहे त्यापेक्षा गुरु ग्रहाचे अंतर चार पटीने जास्त आहे. म्हणून या ताऱ्यापासून निर्माण होणाऱ्या गर्मीची आपण चिंता करू शकत नाही. असं झालं तर तुम्ही पृथ्वीवरून या तार्‍याला बघू मात्र शकाल. असं जर झालं तर गुरु हा तारा लाल रंगाचा थोडा चंद्रा पेक्षा मोठा दिसेल. 

काय याच्यामुळे आपल्या सौरमंडळावर याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होईल ?
जरी हा तारा इतका मोठा झाला तरी हा आपल्या सौर मंडळातील ग्रहांना जास्त इजा पोहोचू शकणार नाही, परंतु तो इतर सौरमंडळांमध्ये धुमाकूळ घालू शकतो. फक्त आपल्या समोर एक मोठा प्रश्न राहील जे गुरु ताऱ्यावरून येणारे मोठे दगड. जर भविष्यात असं झालं तर या ताऱ्यावरून येणाऱ्या दगडांना ओळखून आपल्याला अगोदरच नष्ट करावी लागतील हे तंत्रज्ञान विकसित करायला पाहिजे. 

पण हीच गोष्ट आपल्या सूर्यासोबत झाली आणि 80 सूर्य मिळून एक मोठा तारा जन्माला आला तर मात्र आपल्या सौर मंडळाचं काही खरं नाही.

Related Posts

1 comment

सुहास पासलकर 19/06/2020 - 5:38 pm

छान माहिती आहे

Reply

सुहास पासलकर साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply