शनी देवांच्या प्रकोपा पासून वाचण्यासाठी हे उपाय करा

by Geeta P
234 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

हिंदू धर्मात वारांसाठी प्रत्येक दिवसांसाठी वेगवेगळे नियम शास्त्रात लिहिलेले आहेत. प्रत्येक वार कुठल्या न कुठल्या देवी-देवतांचा ठरलेला असतो त्याप्रमाणेच आपण प्रत्येक दिवशी चांगली वाईट कामे करत असतो प्रत्येक गोष्टीसाठी हिंदू धर्मात नियम बनवून दिलेली आहे त्याप्रमाणे काही जणांचा त्यावर विश्वास असतो किंवा काहीच त्याला दुर्लक्ष करत असतात त्याप्रमाणेच शनिवार हा पण शनिदेवांचा वार म्हणून आपण त्यादिवशी दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी टाळतो ज्यामुळे शनिदेव आपल्यावर रागावतील किंवा त्यांचा आपल्यावर प्रकोप होईल, असे म्हणतात की शनिदेव तुमच्या पायाशी संबंधित आहेत त्यामुळे मंदिरात गेल्यावर तुमची चप्पल चोरीला जाणे ही घटना शुभ संकेत म्हणून मानली जाते असे म्हटले जाते की आता शनिदेव आपला पाटलाग सोडणार आहेत म्हणूनच असेही म्हणतात की शनिवारच्या दिवशी तुम्ही चप्पल किंवा शूज चुकूनही खरेदी करू नका. 

आपल्या घरात जेव्हा लोक येतात तेव्हा ते चप्पल शूज घालून येतात त्यांच्यासोबत राहू-केतू सारखे पापी ग्रह देखील प्रवेश करतात तसेच आपल्या घराच्या मुख्य दरवाजा समोर चपलांचे आणि बुटांच्या अस्ताव्यस्त रांगा असतात, या रांगा पासून आपल्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो शनिदेवा पासून मुक्ती मिळण्यासाठी शनिवारी मंदिराच्या समोर काळे रंगाची चप्पल किंवा शूज सोडून यावे आणि नंतर मागे वळून न पाहता परत या. यामुळे तुम्ही शनि दोषांपासून मुक्त व्हाल. तसेच फाटलेले शूज किंवा फाटलेली चप्पल घातल्यामुळे शनिमहाराजांची अशुभ सावली किंवा घरात अस्वस्थता कायम राहते त्यामुळे शनिवारी चप्पल किंवा शूज खरेदी करण्यावर देखील मनाई आहे. संबंधित असलेल्या वेदना किंवा दुःख त्याबरोबरच आपल्या आयुष्यात खरेदी करणं प्रकर्षाने टाळावे..

शनीचा प्रकोप टाळण्यासाठी हे उपाय करावेत

बजरंगबली आपल्याला या प्रकोपापासून टाळू शकतात त्यामुळे तुम्ही दर शनिवारी बजरंग बली ची साधना करावी या दिवशी तुम्ही हनुमान चालीसा, सुंदर कांड तसेच मारुती स्तोत्र यांचे पठाण करावे यामुळे आपल्याला शनीची चांगली कृपा प्राप्त होईल आणि आपण शनीच्या रागापासून वाचु शकू.

तसेच शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमाना समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावणे आणि दर्शन करणे यामुळेही आपल्याला शनीची चांगली कृपा मिळेल

यामुळे शनिवारी शनि संबंधित कुठल्याही वस्तूंचे दान कुणाकडूनही घेऊन नये यामुळे शनिदेव क्रोधाचे भागीदार बनतात आणि याचा परिणाम आपल्या आयुष्यावर दिसून येतो.

शनीचा राग टाळण्यासाठी आपण शरीरावर चार-पाच किंवा सहा मुखी रुद्राक्ष धारण केला पाहिजे आणि काळ्या रंगाच्या घोड्याची नाल पासून बनवलेली अंगठी मधल्या बोटात घालून ठेवली पाहिजे यामुळे शनिदेवांचा राग कमी होऊन त्यांची कृपा प्राप्त होईल, यासाठी मोहरीच्या तेलाने बजरंगबली ना आंघोळ घालून पूजा करावी 

Related Posts

Leave a Comment