गुरूवार, जून 24

अनोळखी व्यक्तींपासून सुरक्षित राहण्यासाठी महिलांसाठी फेसबुक चे नवीन फीचर

आजकाल आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणून सोशल मीडिया बनले आहे. सध्या भारतामध्ये विविध प्रकारच्या समाजमाध्यमे उपलब्ध आहेत, त्यामध्ये फेसबुक व्हाट्सअप ट्विटर इंस्टाग्राम इत्यादी हे माध्यमे आपल्याला जग जवळ आणतात, त्यामध्ये तितका फायदा होतं म्हणा पण आपली प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.

ग्रामीण भागा पासून तें शहरी भागांमध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आजकाल फेसबुक हे ॲप सर्रास वापरले जातात.फेसबुक वर आपले फोटोज आपण कुठे फिरलो, आपला वाढदिवस इत्यादी गोष्टी या फेसबुक वर संकलित केल्या जातात.

पण याचा तोटा महिला वर्गांना होऊ शकतो यासाठी फेसबुक मे एक नवीन फिचर लॉन्च केले आहे, हे फिचर अगोदर सुद्धा होते, पण ते खूप किचकट होते. आता फेसबुक महिला वर्गासाठी एक सोप्या पद्धती मध्ये आपली फेसबुक प्रोफाईल लॉक करण्याचे फीचर आणले आहे. एका क्लिक मध्ये तुम्ही अनोळखी व्यक्तींपासून आपली फेसबुक प्रोफाईल सुरक्षित ठेवू शकता. या पिक्चर चे नाव आहे “प्रोफाईल लोक”


हे फिचर चालू केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची प्रोफाइल दिसेल परंतु त्याच्या वरती टॅप केल्यानंतर प्रोफाइल उघडली जाणार नाही. तुमची प्रोफाईल फक्त तुमचे मित्र बघू शकतात. तुमचे पोस्ट, तुमचे व्हिडिओज, टाईम लाईन इत्यादी फक्त तुमच्या ओळखीच्या मित्रांना दिसु शकते. ह्या फीचर साठी आपल्याला आपले फेसबुक ॲप हे अपडेट करून घ्यावे लागेल.

पुढील काही पद्धती वापरून तुम्ही आपले फेसबुक प्रोफाईल लोक करू शकता.

  1. तुमच्या प्रोफाईल वर जा
  2. उजव्या बाजूला असणाऱ्या तीन टिंबांवर दाबून प्रोफाईल सेटिंग उघडा.
  3. इथे तुम्हाला ५ व्या नंबर वर Lock Profile हा पर्याय दिसेल. त्या वरती दाबून प्रोफाईल लॉक करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.