How to grow basil at home घरामध्ये तुळस सुकून जात असेल तर हे उपाय करा

by Geeta P
370 views
How to grow basil at hom

How to grow basil at home तुळस ही Holy basil आपल्याला आरोग्य दृष्ट्या खूप महत्त्वाची वनस्पती आहे.

importance of Holy basil plant in india

भारतीय संस्कृतीत तसेच परंपरेत तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे.

तुळस मांगल्याचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते घरा मध्ये प्रत्येकाच्या तुळस असणे म्हणजे संस्कृतीचे प्रतीक असते.

भारतीय संस्कृतीत आणि वारकरी संप्रदाय मधे तुळशीला खूप महत्त्व आहे.

तुळशीचे पावित्र्य जपण्याचा खूप महत्त्व आहे भारतातील महिला रोज सकाळी उठून तुळशीला पाणी घालतात पूजा करून प्रदक्षिणा घालतात.

वारकरी लोक गळ्यात तुळशी ची माळ आवश्य घालतात तुळशीला जसे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे.

तसेच ते शारीरिक आणि आरोग्य दृष्ट्याही खूप महत्त्वाची मानली जाते लक्ष्मी समान तुळस कल्याणकारी तसेच सुख देणारी मानली जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या अंगणात आणि घरात तुळस असतेच तिला सकाळ-संध्याकाळ दिवा लावला जातो पुजाही नेहमीच केली जाते. 

श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तर दिवाळीनंतर तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे.

सत्य नारायण असो किंवा विष्णूची कुठलीही पूजा पूजेच्या वेळेस तुळस ही आवश्यक असतात.

तुळशीच्या पाना शिवाय देवाला नैवेद्य अर्पण करत नाही.

असे केल्याने नैवेद्याचे पावित्र वाढून तो शुद्ध होतो.

परंतु अनेकांच्या घरा मध्ये तुळशीचे रोपटे किंवा पाणी वारंवार चुकून जातात यामागे अनेक गैरसमज आहेत.

परंतु रोप लावण्याची पद्धत यामुळेही तुळशीचे रोप चुकून जाऊ शकते.

ज्या जमिनीत पाणी साचून राहते तिथे तुळशीचे रोप कुजतात त्यामुळे कोरड्या किंवा जिरपणाऱ्य ठिकाणीच रोप लावावे.

How to grow basil at home
How to grow basil at home

How to grow basil at home आशा मातीत लावावी तुळस

तुळशीचे रोप लावताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी तुळशीला जास्त पाणी घातल्या मुळे रोप नीट लागत नाही.

जास्त पाणी झाले तर तुळशीच्या रोपाला बुरशी लागू शकते त्यामुळे 70 टक्के माती आणि 30 टक्के वाळू एकत्र करूनच रोप लावावे.

त्यामुळे पावसाळ्यात किंवा इतर वेळेला जास्त झालेले पाणी वाळू मुळे खाली निघून जाईल.

गाय आणि शेती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत गाईच्या, दुधाचा, शेणाचा, मूत्राचा या सर्व गोष्टींचा फार उपयोग होतो.

तसेच तुळशीचे रोप येण्यासाठी शेणखतही महत्वाचे ठरते पण शेणखत टाकताना ते सुखे असावे म्हणजे रोपांना चांगले पोषण मिळते.

शेणखत नेहमी वापरल्यामुळे रूपात असलेल्या मातीला वेगळाच आकार येतो आणि त्यात भौतिक गुणधर्म निर्माण होतात.

तसेच त्यात सेंद्रिय कर्बोदकांचे प्रमाण वाढते मुळाची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती होऊन वहन देखील चांगले होते.

त्यामुळे शेणखतही रोपांसाठी आवश्यक असते. 

Story of Bhishma Pitamah आठ मुले गंगा नदीत विसर्जित करणारी देवी..

पाणी कधी घालावे

तुळशीच्या रोपाला पाणी हे खूप जपून आणि काळजीपूर्वक घालावे कारण जास्त पाणी झाल्यावर तुळशीचे रोप कुजतील.

थंडीच्या दिवसात तीन-चार दिवसांनी एकदा पाणी घालावे.

पावसाळ्यात पाऊस असेल तर पाणी घालू नये आणि उन्हाळ्यात मात्र दिवसातून किमान एकदा मोजकेच पाणी घालावे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

Plants not Good for Home as per Vastu हि पाच झाडे घरात चुकूनही लावू नका - Domkawla 23/07/2021 - 8:05 pm

[…] […]

Reply

Leave a Comment