गुलाबजाम बनवण्याची सुरुवात भारताच्या इतिहासात कशी झाली ?

History of Gulab Jamun

आपल्याला नेहमी आवडणारा गुलाबजाम आपल्याकडे प्रत्येक सनात, कार्यक्रमात गोड पदार्थांमध्ये उपस्थित असतोच. याच्या शिवाय मिष्ठानाला शोभा येतच नाही. गुलाब जामून आपल्याकडे अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.

गुलाब जामून नाव काढले तरी सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मैदया पासून बनवलेले हे गोल गोळे ज्या वेळेस पाकात जातात. ते रसरशीत चव देतात.

आपण त्याचा स्वाद घेण्या पासून आपण स्वतःला थांबू शकत नाही.

त्याच्या आस्वादाचा आंनदच वेगळा असतो. भारतातील गोड पकवाना मध्ये गुलाब जामून चे स्थान महत्त्वाचे आहे.

तुम्हाला माहिती आहे, का या गोड गुलाब जामून चा एक इतिहास आहे. आज आपण या बहुसंख्य लोकांच्या जिभेची तहान भागवणाऱ्या पकवानाच्या इतिहासावर एक नजर टाकुयात. 

भारतीय इतिहासात गुलाबजाम विषयी खूप रंजक वर्णन केले आहे. गुलाबजाम च्या निर्मितीची कथा देखील तितकीच रोमांचक आहे. शहाजाण मुघल बादशहा च्या दरबारी असलेल्या एका आचाऱ्याने पारसी , तुर्की पकवानांचा आधार घेऊन काही स्थानिक हलवायाच्या मदतीने गुलबजामची निर्मिती केली. 

पर्शियन लोकांचा बमियाह , तुर्कीश तूलांबा हे दोन गोड पदार्थ ही गुलाबजामला मिळते जुळते आहेत. हे पदार्थ चवीला गोड असतात. त्यांना देखील साखरेचा माध्यमातून गोडवा प्रदान करण्यात येतो.

फक्त आपण गुलाबजाम थंड खातो, हे पदार्थ गरम गरम खाल्ले जातता. या परदेशी पदार्था पासूनच मुघल आचाऱ्याकडून या गुलाबजाम ची निर्मिती झाली होती. 

नारी ने ठरवल तर ती काहीही करू शकते, याच एक जिवंत उदाहरण

गुलाबजाम भारतात कसा आला

खाद्य संस्कृतीचे इतिहासातील आभ्यासक मायकल क्रॉडी यांचा मतानुसार पर्शियन अक्रमकच गुलाबजाम भारतात घेऊन आले. पर्शियन लोकानिच गुलाबजाम हे नाव प्रदान केले असल्याचे हे नमूद केलेले आहे. पुढे त्यांनी त्यांचा पुस्तकात आंसेही लहलेले आहे की, गुलाबजाम हे मध्य पूर्वेतिल पकवानापेक्षा वेगळा असून त्याचा निर्मिती साठी दुधाचा वापर केला जातो. पहिले ते गोळा बनवून मग ते तळतात आणि नंतर त्याचे तुकडे करत नाहीत. 

गुलाबजाम ची निर्मितीत मतवाद ही आहे, गुलाबजाम हा पदार्थ अरबस्तान मधील लुकमत अल काडी या पदार्थांची प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला. त्याची निर्मिती देखील गोल गोळे बनवून ते मध्यात बुडवून साखरेत मिसळून बनवले जातात.

लुकमत अल काडी म्हणजे असा पदार्थ जो एखाद्या कठोर न्यायधीशाने खाल्ले असता, त्याचे मत परिवर्तन होऊ शकते. तर मग तो पदार्थ कसा आणि किती लज्जतदार असेल याची कल्पना येईल. 

अरबस्तान आणि भारत यांच्यात जेव्हा सांस्कृतिक देवाणघेवाण चालू झाली, तेव्हा त्याचे परिणाम म्हणून हा गुलाब जामुन भारतात आला. भारतात गुलाबजाम वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्रकार दिसून येत. यावरूनच भारतात गुलाबजाम असा आला असेल याची कल्पना येते.

गुलाबजाम चे प्रकार

गुलाबजामचा अजून एक प्रकार अस्तित्वात आला हा गुलाबजाम लांब सडकआणि तांबड्या रंगाचा असतो , याला य लेडीकिनी असे म्हणतात हा गुलाबजाम चा प्रकार प्रामुख्याने कोलकाता या शहरात मिळतो. या लेडीकिनी गुलाबजामची ही एक कथा आहे असे म्हणतात. 

१८५० साला मध्ये ब्रिटिश गव्हर्नर अस्तित्वात होती. ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कॅनिग ने तिथे प्रसिद्ध असलेल्या भीम चंद्र नाग नावाच्या हलवाई मिठाई वाल्याला आपल्या पत्नी लेडी कॅनिग यांचा साठी एक खास मिष्टण बनवायचा आदेश दिला. लेडी कॅनिग हा पदार्थ खूप आवडला.

हा पदार्थ खास लेडी कॅनिगयांचा साठी खास बनवला होता, म्हणून त्या पदार्थाला लेडीकिन असे नाव देण्यात आले.

बंगाल मध्ये प्रसार करण्यासाठी लेडी कॅनिगयांनी मदत केली.

सुखा गुलाबजाम

कुंभकोणम येथे गुलाबजामचा आणखी एक प्रकार आढळून येतो. येथे या प्रकाराला सुखा गुलाबजाम म्हणून ओळखले जाते, कुंभकोणम येथे गुलाबजाम फक्त एकाच स्वीट होम मध्ये मिळतो. 

चे नाव मुरारी स्वीट होम असे आहे. 

सुखा गुलाबजामची विक्री हा एकच परिवार खूप वर्षापासून करत आहे. सुखा गुलाबजाम बनवण्याची पद्धत ही गुलाबजाम सारखेच असून, फक्त गुलाबजाम सात दिवस फ्रिजमध्ये ठेवतात. ज्यामुळे तो साखरेचा पूर्ण भाग शोषून घेऊन सुखा बनतो.

हा गुलाबजाम आकाराने थोडा लहान असतो पण तो खाण्यासाठी अतिशय चविष्ट असतो. जर तुम्ही तमिळनाडूतील कुंभकोणम या तीर्थक्षेत्री जाताल तर नक्की या गुलाबजाम आस्वाद घ्या. 

गुलाबजाम च्या परिवारात गुलाबजाम मध्ये भारतात अजून एक प्रकार प्रसिद्ध ज्याला काला जामून असे म्हणतात, हा जामून काळ्या किंवा जांभळ्या रंगाचा असून चवीला जरा गोड असतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.