जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे असंख्य फायदे
भारतीय संस्कृतीमध्ये आपण जेवण केल्यानंतर मुखवास हा पदार्थ वापरतो, पण हा पदार्थ वापरायचे सुरुवात प्राचीन काळामध्ये चालू झाली, यामध्ये शास्त्र दडलेले होते. प्रत्येकांच्या घरी पानाचे तबक हे असतेच, कोणी आपल्या घरी जेवण्यासाठी आल्यानंतर जेवणाचा पूर्णपणे आनंद घेतल्यास आपण ते पानाचे तबक त्याच्यासमोर धरतो, आणि त्या तबकामध्ये हमखास बडीशेप असते, जेवण केल्यानंतर बडीशेप खाण्याचे खुप फायदे आहेत, बडीशेप खाण्यामुळे तोंडाच्या दुर्गंधी येत नाही, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक तत्वे असतात. ज्याला आपण सौफ किंवा बडीशेप म्हणतो त्यामध्ये कॅल्शियम, मॅगनीज, जिंक, पोटॅशियम आणि मोठ्या प्रमाणावर क जीवनसत्व असते, असे बरेच फायदे आहेत।
तर चला आज आपण अशाच फायद्यांना जाणून घेऊयात.
चेहऱ्यावर येणारे मुरूम पुटकळ्या घालवता येतात.
नियमित बडीशेप चे सेवन केल्यास त्यामधून शरीराला कॅल्शियम, मॅगनीज, जिंक, पोटॅशियम चा पुरवठा होतो, आणि शरीरामध्ये होणारे हार्मोन्सचे बदल कमी होतात त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या येत नाहीत.
कर्करोगापासून बचाव
बडीशेप मध्ये बऱ्याच प्रमाणावर फ्री रेडिकल सापडतात, त्यामुळे शरीरात तयार होणारे विषारी द्रव्य टॉक्सिंस बाहेर पडतात त्यामुळे होणारे पोटाचा, स्तनाचा, त्वचेचा कर्करोग टाळता येतो
रक्तदाबावर नियंत्रण
बडीशेप मध्ये पोटॅशियम असल्यामुळे हृदयामध्ये होणारा रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होतो आणि रक्तदाबाचा त्रास कमी होतो.
घातक द्रव्य शरीराच्या बाहेर पडतात
बडीशेप पाण्यामध्ये उकळून पिल्यास शरीरामध्ये तयार होणारे अनावश्यक द्रव्य आपल्या लघवीतून बाहेर पडतात ते द्रव्ये शरीराला खूप घातक असतात. त्यामुळे रक्तशुद्धी करण्यासाठी फायदा होतो
अपचनाचा त्रास कमी होतो
जेवण केल्यानंतर बडीशेप चे सेवन केल्यास अपचन, बद्धकोष्टता, आणि पचन संबंधित विकार हे जडत नाहीत, आणि ज्यांची डोळ्याची शक्ती अधू आहे त्यांच्यासाठी बडीशेप खूप गुणकारी आहे. असे असंख्य फायदे बडीशेपचे आहेत त्यातल्यात्यात शरीरातील त्रिदोष म्हणजे कफ, वात आणि पित्त यावर बडीशेप खूप गुणकारी आहे. उन्हाळ्यामध्ये बडीशेप खाऊन पाणी पिल्यास शरीर थंड राहते.