या कारणामुळे फेअर ॲन्ड लव्हली नाव बदलत आहे

227 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

वर्णभेद जगातली सगळ्यात मोठी समस्या आहे, वर्णभेदावरून नुकत्याच उफाळलेल्या अमेरिकेमधील दंगलीनंतर जाहिरात करणाऱ्या बऱ्याच कंपन्या त्यांच्या जाहिरातीतून रंगाचा उल्लेख काढून टाकला आहे, खुद्द महात्मा गांधींना सुद्धा आफ्रिकेमध्ये या वर्णभेदाच्या समस्यांमधून जावे लागले.

भारतीय बाजारपेठेमध्ये 1975 साली आलेल्या फेअर ॲन्ड लव्हली फेअरनेस क्रीम ची जाहिरात मोठ्या प्रमाणात गाजली, गोरे पणा म्हणजे सौंदर्य असंच काहीतरी गणित भारतीयांच्या मनामध्ये बसलेल, जाहिरातींमध्ये दाखवल्या प्रमाणे क्रीम लावली असता चेहर्‍यावर उजळ पणा येतो, ही मानसिकता प्रत्येक भारतीयांमध्ये रुजली होती, त्यामुळे या क्रीमने 70 टक्के भारतीय बाजारपेठ काबीज केलेली होती, भारत नव्हे तर पूर्ण आशिया मध्ये हे क्रीम वापरली जात होती.
ही क्रीम बनवणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपनीने क्रीम च्या जाहिराती मधील फेअर ॲन्ड लव्हली नावामध्ये फेअर हा शब्द वगळण्याचे ठरवले आहे, आणि कुठल्याच उत्पादनामध्ये फेअर हा शब्द वापरनार नसल्याचे ट्विटरवरुन सांगण्यात आले. 

कारण या कंपनीला सुद्धा वर्णभेदाचा सामोरे जावं लागलं होतं त्यामुळे त्या कंपनीवर अनेक टीका होत होत्या, या जाहिराती मुळे ही कंपनी वर्णभेदाला बढावा देत आहे असे टीकाकारांचे म्हणणे होते. 

काही काळा पूर्वी बॉलिवूडमधील कलाकारांनी या वर्णभेदाला कंटाळून आशा जाहिराती करणार नाही असं ठरवलं होतं. आणि नुकत्याच जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तिच्या हत्येनंतर अमेरिकेमध्ये खूप मोठा वाद उसळला होता याच कारणामुळे या कंपनीने हा निर्णय घेतला असावा.
आता आपली लाडकी फेअर ॲन्ड लव्हली क्रीम नवीन रुपा मध्ये बघायला मिळेल. 

Related Posts

Leave a Comment