अबब सोन्याचे हॉटेल, येथे टॉयलेट कमोड सुद्धा सोन्याचे आहे

by Geeta P
223 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

जगामध्ये एका भयानक विषाणूने थैमान घातलेले असताना आणि जग या विषाणूशी लढत असताना काही अशाही आश्चर्यकारक घटना घडत आहेत. आज आम्ही तुम्हाला एका अशाच आश्चर्यजनक घटनेबद्दल सांगणार आहोत. हनोई म्हणजे व्हिएतनामची राजधानी येथे एका भव्य सोन्याचे हॉटेल सुरू करण्यात आले आहे. हो हो सोन्याचे हॉटेल !

वाटले न ऐकून आश्चर्य ?
व्हिएतनाम ची राजधानी असणाऱ्या हनोई येथे पूर्णपणे सोन्याने मढवलेली हॉटेल सुरू करण्यात आले आहे. या हॉटेलच्या भिंती, फाटक फर्निचर तसेच सजावटीसाठी शोभेच्या वस्तू त्याच बरोबर बाथ टब आणि कमोड हे सुद्धा सोन्याने मढवलेले आहे. या सोन्याने मढवलेल्या हॉटेलचे नाव Dolce Hanoi Golden Lake Hotel असे देण्यात आले आहे हे जगातील भव्य आणि लक्झरिअस हॉटेल असेल. हे हॉटेल पूर्णपणे सोन्याने मढवलेले आहे या हॉटेल मधल्या प्रत्येक वस्तू खूप लक्झरिअस असतील आणि त्यासोबत या खूप शाही असतील. हे हॉटेल २५ मजल्यांचे असून यामध्ये एकूण ४०० खोल्या आहेत.

या हॉटेलच्या बाहेरील बाजूस भिंतीवर सुमारे ५४ हजार चौरस फुटांची गोल्ड प्लेट्स टाइल्स बसवलेली आहे. लॉबीमध्ये फर्निचर आणि सजावटीसाठी ठेवलेल्या वस्तूदेखील सोन्याची कलाकुसर असलेले आहेत. आणि तुम्हाला हे ऐकून देखील आश्चर्य वाटेल. या हॉटेलमधल्या वॉशरूम मध्ये बाथटब, शॉवर तसेच सिंक या सर्व वस्तूंना सोन्याने मढवलेली आहे.

याबरोबरच बेडरूम मध्येही फर्निचर आणि सजावटीसाठी ठेवलेल्या वस्तूंना सोन्याची झळाळी मिळणाऱ्या आहेत. खोल्यांचे छतही सोन्याने मढवलेले आहे. तसेच त्यांनी छतावर इन्फिनिटी पूल बनवला आहे जिथून तुम्ही हनोई शहराचे विहंगम दृश्य पाहू शकता. या हॉटेलची उभारणी चे काम २००९ ला सुरू करण्यात आले होते आणि. Hoa Binh Group ने हे हॉटेल बनवले आहे. 2 जुलैला या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. या हॉटेल च्या प्रेसिडेन्शिअल सूईटमध्ये एक रात्र मुक्काम करायचा असेल तर ४.८५ लाख रुपये मोजावे लागतील. तसेच तुम्हाला जर या हॉटेलमध्ये डबल बेडरूम सुईट मध्ये एका रात्रीच्या मुक्कामाचे शुल्क सुमारे ७५ हजार इतके आहे. तसेच अन्य खोल्यांचे सुरुवातीचे शुल्क २०००० इतके आहे. आहे ना खरंच भव्य आणि आश्चर्य वाटणारी हॉटेल.

Related Posts

Leave a Comment