Deep Amavasya दीप अमावस्या का साजरी केली जाते ? जाणून घ्या तीची 1 कहाणी

by Geeta P
878 views
deep amavasya

Deep Amavasya दीप अमावस्या , पौर्णिमेला, आणि सर्व सणांना खूप महत्व दिले जाते. परंपरेने चालत आलेल्या प्रत्येक सणांचे वेगळे महत्त्व आहे.

Deep Amavasya दीप अमावस्या म्हणजे काय ?

इथे सन खूप उत्साहात साजरी केली जातात. सगळे नियम धर्म पाळून सगळे सण साजरे केले जातात. आज आपण अशाच आषाढ अमावस्या म्हणजे दीप अमावस्या बद्दल बोलणार आहोत.

आषाढ अमावस्या, दीप अमावस्या कशी साजरी केली जाते. हे आपण खालील पद्धतीने पाहणार आहोत. या दिवशी दिव्यांना खूप महत्त्व दिले जाते.

आपल्याला सदोदित प्रकाश देणारा दिवा नेहमी स्वतः अंधारात राहतो. दिवे आपल्या जीवनातील अंधार दूर करून आपल्याला प्रकाशा कडे नेतात.

त्यांच्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण म्हणून दिव्यांची पूजा केली जाते.

या दिवशी घरातील स्त्रीया सर्व दिवे स्वच्छ दुधा दह्याने धुऊन पाटावर नवीन वस्त्र टाकून त्याच्या वरती ठेवतात. पाटा भोवती रांगोळी काढतात.

दीप सर्व प्रज्वलित करून त्यांची विधी युक्त फळ, फूल, वस्त्र घालून पूजा करतात.

त्याचबरोबर त्यांना आघाडा, दूर्वा, वाहिली जातात.

आज पासून या पानांना प्रत्येक सणांमध्ये खूप महत्त्व दिले जाते. त्याचबरोबर दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो.

दिव्यांची पूजा करून झाल्यावर घरातील लहान मुलांची औक्षण करतात.

दुर्वा हे वंश वृद्धी चे प्रतीक मानले जातात. त्यामुळे ते अर्पण करू प्रार्थनाही करतात. ही प्रार्थना अशी आहे.

दीप सुर्याग्णिरूपस्तवं तेजसां तेज उत्तमम |गृहान मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव

हे दीपा, सूर्य रूप, अग्नि रूप आहेस. तेजो मध्ये तू उत्तम तेज आहेस.

माझ्या पूजेचा तू स्वीकार कर. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. अशी प्रार्थना करून दिव्याची कहाणी ऐकली जाते.

कहानी ऐकल्याने आरोग्य, लक्ष्मी यांची फलप्राप्ती होते असे धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.

दीप अमावस्या
दीप अमावस्या

दीप अमावस्या Ashadha Amavasya व तीची कथा

खुप वर्षांपूर्वी तमिळनाडू या मध्ये पशुपती नावाचा एक शेट्टी राहत होता, त्याच्या श्रेष्टीला गौरी आणि विनीत अशी दोन संताने झाली.

त्यांच्या लहानपणी दोघांनीही असे ठरवले होते, की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विणीतच्या मुलांना लग्नासाठी द्याव्या. पुढे दोघेही मोठे झाले दोघांची लग्न झाले.

गौरीला तीन मुली झाल्या. विनीत ला तीन मुले झाली. गौरीच्य धाकट्या मुलीचे नाव सगुना असे होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनितचे दैवत फिरल्यामुळे तो खूप गरीब आणि दारिद्र्याने खचला होता.

भावाची ही दशा पाहून गौरी आपले वचन विसरली. आणि पहिल्या दोन मुलींचे लग्न श्रीमंतांच्या घरात करून दिले.

नंतर ती त्या मुलीचे म्हणजे सगुणा च्या लग्नाचे पाहू लागली. गौरीने म्हणजे तिच्या आईने आपल्या भावाला दिलेले वचन मोडले हे ऐकून सगुनेला वाईट वाटले.

मग तिने विणीत च्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले. यावर गौरी खूप संतापली तिने आपला निर्णय बदलला नाही.

लग्न होऊन ती विनीत च्या घरी गेली गरिबीचा संसार सांभाळू लागली. एके दिवशी त्या नगर चा राजा आंघोळी साठी नदीवर गेला होता. त्याने आपली रत्नजडित अंगठी कट्ट्यावर ठेवली होती.

ती एका घारीने उचलून नेली. अंगठी घेऊन घार उडून गेली आणि सगुणाच्या छपरावर जाऊन बसली.

ती खायची वस्तू नाहीये असे समजल्यावर तिने ती वस्तू तिथेच टाकून दिली. नंतर ती सगुनेला मिळाली. जेव्हा तिला कळले ही अंगठी राजाची आहे.

तेव्हा तिने ती राजाला परत नेऊन दिली. सगुणाचा प्रामाणिकपणा पाहून राजा खूप खुश झाला. सगुणाला बक्षीस दिले.

अजून काय मागायचे ते माग असे सांगितले. तेव्हा सगुना म्हणाली येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिव्य असावे. दुसऱ्या कोणाच्या घरात दिवे लागू नये असा हुकूम काढा, राजाने तसे केले.

मग शुक्रवारी सगुणा ने सर्व घरभर दिवे लावले, त्यादिवशी तिने उपवास ठेवला. त्यादिवशी नगरात कोणाच्याही घरी दिवे पेटले नाहित.

आपल्या दोन्ही दारांच्या पुढच्या व मागच्या बाजूला आपल्या दोन दिरांना उभे केले, आणि सर्व सुवासिनी ला बोलावले आणि येणाऱ्या सुवासिन बाई कडून परत जाणार नाही.

अशी शपथ घेतली. आणि घरातून मागचा बाजूने जाणाऱ्या बाईकडून परत येणार नाही, अशी अशी शपत घ्यायला लावली.

आशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली. अवदसा निघून गेली. अशाप्रकारे सगुणाच्या घरात सतत लक्ष्मीचा वास राहिला.

म्हणून दिव्या च्या पूजेला म्हणजे दीप अमावस्या खूप महत्त्व मानले गेले आहे.

गटारी अमावस्या
याचबरोबर या दिवशी काही जण ही अमावस्या गटारी म्हणूनही साजरी करतात परंतु पौराणिक शास्त्रामध्ये याचा उल्लेख कुठेही नाही.

ती साजरी करणे म्हणजे त्यादिवशी मांसाहार करणे आणि दारू पिणे अशी ती साजरी करतात. परंतु हे चुकीचे आहे.

आपण जर असेच करत राहिलो तर पुढच्या पिढीला याचे महत्त्व कळणार नाही, त्यामुळ या शुभ दिवशी ही अमावस्या दीप पूजन करून साजरी करावी. या सणाचे महत्व पुढच्या पिढीला कळेल.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

3 comments

SANDIPAN KARDE 19/07/2020 - 11:56 am

Good info

Reply
Rekha Chotaliya 20/07/2020 - 7:20 am

Nice information….

Reply
101 Motivational Quotes in Marathi मराठी सुविचार | DOMKAWLA 31/07/2021 - 11:48 am

[…] Deep Amavasya दीप अमावस्या का साजरी केली जाते ? … […]

Reply

Rekha Chotaliya साठी प्रतिक्रिया लिहा Cancel Reply