HistoryKnowledgeTourism

१६१ खांबांमधून सप्तसुर येणारे शंकराचे गूढ मंदिर

जगामध्ये भारताची संस्कृती सगळ्यात महान मानली गेली आहे, कारण भारताला प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे, आपण तेहतीस कोटी देवांना मानतो, आणि तेवढ्यात देवांची मंदिरे ही भारतामध्ये अस्तित्वात आहेत, भारताची लोकसंख्या बघता जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती अशा उक्ती प्रमाणे प्रत्येक कुटुंबाचे वेगवेगळ्या आराध्य दैवत आहे, आणि प्रत्येकाचे स्वतंत्र मंदिरे आहेत, प्रत्येक मंदिरा मागे काहीना काही रहस्य आणि कारण आहे, भारतामध्ये सर्वात जास्त प्राचीन शिवमंदिर आहेत, आणि प्रत्येक मंदिराचे एक रहस्य आणि त्या पाठी मागील कथा आहेत.
मंदिराचे वय बघता साधारणतः हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर बांधले गेलेले आहेत, आणि त्या काळी अवगत असलेली स्थापत्य कला त्या वास्तू मधून दिसते, कालांतराने भारतामध्ये परकीय आक्रमणे झाली, त्या अक्रमाना मध्ये बरचे मंदिरे नष्ट केली गेली, का काही मंदिरांची नासधूस झाली. तरीपण बांधकाम मजबूत असल्यामुळे ते मंदिरे अजूनही तटस्थ उभे आहेत. आणि या स्थापत्य कलेचे नमुने बघण्यासाठी पर्यटक दरवर्षी भारतामध्ये रांगा लावत असतात. 

ह्यामध्ये आपण महाराष्ट्र मध्ये वेरूळ अजिंठा जर बघितले तेथे अजूनही सुस्थितीत मंदिरे आहेत, काही मंदिरे तर एकाच भल्यामोठ्या दगडांमध्ये बनवलेले आहेत. अशाच मंदिरांच्या यादीमध्ये तिरुपती बालाजीचे मंदिर, पद्मनाभा नाचे मंदिर, ओरिसा मधील कोणार्क मंदिर. अशा विविध स्थापत्यकलेचे उत्तम उदाहरणे आहेत. आज आपण अशाच एका मंदिरा बद्दल जाणून घेणार आहोत. जे की ते शंकराचे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या खांबा मधून संगीताचा आवाज येतो.

तसे पाहिले तर दक्षिण भारतामध्ये शंकर महादेवाचे खूप मंदिरे आहेत, पण त्यामध्ये रहस्य असलेले एक मंदिर आहे. तामिळनाडूमधील तिरुनलवेली येथील शंकराचे मंदिर. भगवान शंकराचे नटराज याचे प्रतीक म्हणून हे मंदिर उभारले गेले आहे, या मंदिराची रचना होत असताना त्या मंदिराचे 161 म्युझिकल पिलर आहेत. यामधून आजही गुड प्रकारचे संगीत ऐकावयास मिळते. हे मंदिर सुमारे 14 एकर परिसरात उभारले गेले आहे. 

तिरुनलवेली ही जागा शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाची जागा आहे असं कथांमध्ये सांगितले जातो, आणि या विवाहास भगवान विष्णू उपस्थित होते असंही सांगितलं जातं. कुठल्याही एका खांबावर थाप मारली असता त्यामधून सप्त सूर ऐकू येतात, आणि या 161 खांबामधील 48 खांब एकाच मोठ्या शिळेतून कोरले गेले आहेत. भगवान शंकर म्हटलं की त्यांची गूढ मंदिरेही आलीच, प्रत्येक मंदिरामागे काहीना काही मोठे रहस्य असते, अशाच एका मंदिरांमधले हे तिरुनलवेली चे नटराज चे मंदिर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button