Blackrock Malware तुमच्या बँक संबंधित माहिती चोरणारा व्हायरस

371 views
Blackrock Malware

Blackrock Malware सध्या मोबाइल वापर करणाऱ्यांसाठी खूप डोकेदुखी ठरत आहे.

जगभरात आधुनिक तंत्रज्ञानाचा बोलबाला आहे. आणि प्रगत मोबाईल तंत्रज्ञाना मुळे विकसित तंत्रज्ञान सर्वांच्या हाता मध्ये आहे.

परंतु काही समाज विघातक करणारे लोक सध्या वेगवेगळे वायरस तयार करून इतरांची माहिती चोरण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत.

ते नवनवीन मालवेअर तयार करून तुमच्या मोबाईल मधील डेटा हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

एक प्रसिद्ध सिक्युरिटी फार्म आहे त्याचे नाव आहे Threatfabric.

यांनी एका नुकत्याच जन्माला आलेल्या Blackrock Malware बद्दल सर्वांना धोक्याचा इशारा दिलेला आहे. 

हा malware विविध ३७७ मोबाईल ॲप मध्ये जाऊन आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, बँक अकाउंट ची माहिती चोरतो. 

या आधीही अनेक malware तयार झाले. आणि संपुष्टात पण आहे पण ह्याची खासियत म्हणजे Blackrock Malware तुम्ही लॉगीन करण्याची वाटच बघत असतो.

जेव्हा तुम्ही लॉगीन केले असता  किंवा तुमचे बँक अकाउंट डिटेल्स टाकले, नंतर त्याचं काम तो चालू करतो. 

तुम्ही टाइप केलेला सर्व डेटा त्याच्या Server  मध्ये सेव्ह करतो. आणि अशाप्रकारे तो डेटा चोरी करतो. 

Blackrock Malware
डेटा चोरी

Blackrock Malware ची डेटा चोरी करण्याची पद्धत 

सुरुवातीला हा Blackrock Malware आपल्या मोबाईल मध्ये नकळत इन्स्टॉल होतो. तो स्वतःला लिस्ट मध्ये लपून ठेवतो.

मग नंतर लागणाऱ्या परमिशन तो स्वतःहून मिळवतो. मग नंतर डेटा चोरायला सुरुवात करतो. कधीकधी तो आपण न पाठवलेले मेसेज तो इतरांना पाठवतो.

कीबोर्ड वर स्वतःहून टाईप करतो. हे आपल्याला नकळत करतो.

Blackrock Malware एक प्रकारचे keylogger म्हणजे तुम्ही टाईप करता ती संपूर्ण माहिती स्वताकडे सेव करतो. 

blackrock malware हा व्हायरस फक्त बँकिंग क्षेत्रातील Apps वरच हल्ला करत नसून तो दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या सर्व Apps वरती त्याचा डोळा आहे. 

त्यामध्ये तुम्ही वापरत असलेले फेसबुक, इंस्टाग्राम, हँग आऊट, गुगल पे इत्यादी ॲप्स वरती तो नजर ठेवून आहे. 

हे विष पोटॅशियम सायनाइड पेक्षा ही जालीम आणि घातक आहे

यापासून वाचण्यासाठी तंत्रज्ञानातील जाणकार लोक सल्ला देतात की  कुठलेही app डाउनलोड करायचे असेल तर अँड्रॉइड मध्ये गुगल प्ले स्टोअर मधून डाउनलोड करायला पाहिजे. 

आणि डाउनलोड करण्या अगोदर व्हेरिफाईड बाय गुगल आहे का नाही हेही पाहणे गरजेचे आहे. 

नको त्या लिंक वरती विनाकारण क्लिक नका करू, मोबाईलमध्ये एक अँटिव्हायरस नेहमी ठेवा. आकर्षित करणाऱ्या मॅसेज कडे जास्त लक्ष नका देऊ 

Related Posts

Leave a Comment