No. 1 Best Misal Near me in Nashik नारी ने ठरवल तर ती काहीही करू शकते

273 views
Best Misal Near me

Best Misal Near me in Nashik अनादी काळापासून नारीशक्ती खूप महान आहे.या शक्तीपुढे दुसरी कुठली शक्ती मोठी नाही. तिने मनामध्ये आल्यानंतर काहीही करू शकते. आज आम्ही अशाच एका नारीशक्ती बद्दल सांगणार आहोत.

वयाने जरी जास्त असली तरी खूप महान आहे.ही कथा आहे पंचवटीच्या अन्नपूर्णेची म्हणजेच नाशिक मधल्या सीताबाई यांची. चाळीस वर्षे वय झाल्यानंतर प्रत्येकांना विविध आजारांनी ग्रासलेल असत.

अनेक वेगवेगळे आजार जडलेली असतात.घरातील महिला नोकरी करून घर सांभाळत असेल तर ती वयाच्या पस्तिसाव्या वर्षी ती म्हातारी दिसू लागते.

पण या कथेतील वय वर्ष 84 असलेल्या सीता बाईंची सीताबाई आजही मोठ्या दिमाखाने नाशिक शहरात एक हॉटेल चालवतात. तरुणांना लाजवेल अशी गोष्ट सीता बाईंनी करून दाखवली.नाशिक मध्ये सर्वात फेमस मिसळ आहे ती सीताबाई ची मिसळ.

हॉटेल नाशिक मधल्या भद्रकाली परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहे त्यांचे हॉटेल जुने नाशिक भागात, छपरी तालमी जवळ आहे. सीताबाई च्या लग्नानंतर त्यांच्या पतीला एका मोठ्या आजाराने ग्रासलेले होते आणि कर्ता पुरुष काम करू शकत नव्हता, आणि त्यांचे पती गेल्यानंतर सर्व जबाबदारी त्यांच्यावरच आली होती.

Best Misal Near me

घर खर्चासाठी काही पैसे शिल्लक नव्हते. मग त्यांनी दुधाचा व्यवसाय चालू केला. सीताबाई ना तीन मुली आणि दोन मुलं आहेत.आणि त्यांच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. मग त्यांनी दुधाचा व्यवसाय करत करत त्यांचे शिक्षण पूर्ण केले.

SitabaiChi Misal

मग काही वर्षांनी त्यांनी स्वतःचे एक हॉटेल चालू केले. आज्जी नी सुरुवातीला फक्त शेव हॉटेलमध्ये चालू केली, मग नंतर मिसळही चालू केली. मग त्यांची मिसळ पूर्ण नाशिक मध्ये प्रसिद्ध झाली.

त्या आजही पहाटे पाचला उठून अकरापर्यंत हॉटेल चालवतात आणि नंतर काम करून पुन्हा संध्याकाळी परत हॉटेल चालू होतं हा त्यांचा नित्याचा दिनक्रम आहे.

सीताबाई चा एक मुलगा महापालिकेत आहे तर दुसरा नाशिक मधल्या पैसे छापायच्या प्रेस मध्ये काम करतो.
त्यांची मिसळ व शेव खूप प्रसिध्द आहे. आजही कुठला कामगार हाताशी न घेता त्या या वयात स्वतः गरम तेलात शेव काढण्याचं काम करतात.

Mikaila Ulmer Unbelievable Things You Never Knew About 13 Year Old

हि जिद्द आजकालच्या तरुणांना लाजवेल अशी आहे, या वयात ही त्या आपल्या हक्काचा हॉटेल चालवतात.आलेल्या प्रत्येक संकटावर मात करून यशस्वीरित्या त्यांनी हा व्यवसाय करून दाखवला आहे.

त्यांच्या जिद्दीला डोमकावळा टीम तर्फे मानाचा मुजरा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

Leave a Comment