Best Foods for Brain बुद्धी तीक्ष्ण करणारा हा आहार घ्या

by Geeta P
384 views
Best Foods for Brain

बुद्धी तल्लख करायची आहे? Best Foods for Brain तर मग या खालील गोष्टींचा आपल्या आहारात नक्की समावेश करा. 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी  फेसबूकइंस्टाग्राम

आजकालच्या स्पर्धेच्या युगात सर्वांना स्मार्ट आणि इंटेलिजंट असणे खूप महत्त्वाचे आहे.  त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आपल्याला खूप मेहनत करावी लागते.

आपली बुद्धी तल्लख ठेवावी लागते. मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांना प्रत्येक गोष्टी विचाराने आणि बुद्धीने करावी लागते. शालेय जीवनात मुलांना स्पर्धेला सामोरे जायचे असते. मोठयाना पण घरातील जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळण्यासाठी बुद्धीची गरज असते.

प्रत्येकाला प्रत्येक क्षणी कुठल्याही कामासाठी बुद्धीची गरज पडते. खूप वेळा आपण एखादी महत्त्वाची गोष्ट वारंवार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

जेव्हा वेळ येते तेव्हा नेमक आपण ती गोष्ट विसरतो. तुमच्याही बाबतीत असे कधी घडले असेल!

आज-काल बरेच जण विसरणाच्या तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाताना दिसून येतात. परंतु हा आजार होऊ नये म्हणून त्याच्यावर आधीच काही उपाय केले तर या आजाराला सामोरे जावे लागणार नाही.

त्यासाठीच आज आम्ही या लेखात या आजारावरील उपाय म्हणण्यापेक्षा बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी आपण आपल्या आहारात या गोष्टींचा समावेश नक्की करावा. 

Best Foods for Brain
Best Foods for Brain

बुद्धी तीक्ष्ण करणारे मासे 

मांसाहारी लोकांसाठी मासे खाणे म्हणजे एक पर्वणीच आहे. मासे फ्राय करून खा किंवा ते मसाल्यातले खा मासे खाणाऱ्यांच्या जीभेवर याची चव नेहमीच रेंगाळत असते.

पण तुम्हाला माहिती आहे का हे मासे ही आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतात.  हेल्प एक्सपर्ट च्या म्हणण्या नुसार पेडवे, रावस आणि बांगडा या प्रकारचा माशांमध्ये Omega-3 fatty acids मुबलक प्रमाणात असते.

हे ऍसिड आपल्या मेंदूला तल्लख ठेवण्याचे काम करते. आपल्या मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी आणि मेंदूचे इतर आजार दूर ठेवण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी अशा माशांचे सेवन केले पाहीजे. 

हिरव्या पालेभाज्या
Best Foods for Brain

बुद्धी तीक्ष्ण करणाऱ्या हिरव्या पालेभाज्या

पालेभाज्या खाणे नेहमीच शरीराला चांगले असते. ताज्या भाज्या खाण्याचा सल्ला थोरामोठ्यांचा पासून डॉक्टर हे देतात. पण पालेभाजी म्हणले की सगळ्यांचच नाक मुरडते. 

अनेकांचा पालेभाजी खाण्यास नकार असतो. परंतु तुम्हाला या पालेभाजीचे अजून एखादा गुणधर्म कळाल्यानंतर तुम्ही पालेभाजी नक्की खाल. 

पालक, मेथी, शेपू, आळू या पालेभाज्या आपल्या मेंदू साठी अत्यंत गुणकारी आहेत. परंतु अनेकांना या पालेभाज्या खाण्यास नको वाटते. हिरव्या पालेभाज्या संपूर्ण शरीरा साठी चांगले असतात.

पण त्या मेंदू साठी अधिक गुणकारी असतात. त्यामध्ये पालक आणि ब्रोकोली या विशेष भाज्यां मध्ये. Antioxidant (प्रतिऑक्सीकारक), Folate,beta-Carotene, तसेच Vitamin c मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवते. आणि आपली बुद्धी चांगली ठेवते.

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे
Best Foods for Brain

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे

वरील वाक्य म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन अंड्याचे चित्र येते. परंतु या रोज खाणाऱ्या अंड्याची उपयुक्तता तुम्हाला माहित आहे का?

अंड्या मधला  बलक मेंदू साठी अत्यंत गुणकारी आहे. त्यासोबतच अंड्या मध्ये असणारे विटॅमिन्स आणि मिनरल्स आपली बुद्धी तलख ठेवण्यास मदत करतात. या सोबतच त्यात असणारे आयर्न आपल्या रक्तातील लाल पेशी भरपूर प्रमाणात तयार करतात.

ज्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत मिळतो. याचबरोबर अंड्यातील Vitamin B12 आणि आयोडिन मुळेही बुद्धी तल्लख होतो.

टोमॅटो खा आणि या व्याधी पासून दूर रहा Health Benefits of Tomato

ग्रीन टी
Best Foods for Brain

ग्रीन टी Best Foods for Brain Green Tea

जर तुम्ही ग्रीन टी पीत असाल तर तुम्हाला त्याचा अजून एक उपयुक्त गुण माहीत असायलाच हवा. आजकाल सर्वजण वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पीत असतात.

मानवी मेंदू हा 70 टक्के पाण्याने बनलेला आहे. असे म्हणले तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण यावरून तुम्हाला पाण्याचे महत्व कळेल.

त्यामुळे तर सगळेजण जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण पिऊन किती पाणी पिणार? त्यामुळे ग्रीन टी प्या आणि त्यात असणाऱ्या Antioxidant मुळे मेंदू शांत ठेवा. तो स्थीर होण्यातही मदत होते. 

बुद्धी
Best Foods for Brain

डार्क चॉकलेट 

स्वतः चॉकलेट खाणाऱ्या मुलांना नेहमी पालक ओरडत असतात. चॉकलेट न आवडणारी व्यक्ती क्वचितच सापडेल.

यात चॉकलेटचा स्मरणशक्तीला होणारा फायदा ऐकून कोणीही चॉकलेट खाण्या पासून राहणार नाही. त्याची अशी काही हरकत नाही. डार्क चॉकलेट मध्ये असणारे fiavonoids मानसीक कौशल्य वाढीस लागते.

Related Posts

Leave a Comment