Health

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी ही वनस्पति रामबाण ठरते.

फेसबूक,  इंस्टाग्राम

चित्रात दिसणारे गवत एक अशी वनस्पती आहे तिचा आपल्याला अत्यंत फायदा आहे आणि पंधरा ते वीस रोग बरे करते ही हराळ आहे तिला हिंदीमध्ये दुर्वा किंवा काही ठिकाणी रामघास म्हणतात तुम्ही पण तुमच्या परिसरात बागेत वगैरे कुठे पाहिली असेल या हरळीचा उपयोग गणपती ला वाहण्यासाठी केला जातो. त्याचा फायदा खूप आहे याच्या आरोग्याला अत्यंत फायदे आहेत दुर्वांचा वापर करून आपण नेहमी तरुण होऊ शकतो त्याचप्रमाणे मुळव्याध, मुतखडा, चष्मा नंबर, उलटी, संडास, लघवीच्या सर्व समस्या किंवा यावर त्याचा रामबाण इलाज केला जातो. 

बऱ्याच व्यक्तींना हातापायांना मुंग्या येतात, नसा दाबलेल्या असतात आणि हातापायाच्या बधीर झाल्यामुळे काम व्यवस्थित करता येत नाही अशा व्यक्तीने गुळवेल आणि दूर्वा यांचा काढा करून पंधरा दिवस तिला पीला तर नक्कीच याचा फायदा होतो. जर गुळवेल मिळाला नाही तर हराळी आणि लसुन याची पेस्ट बनवा आणि रोज एक चमचा सकाळी उपाशीपोटी त्याचे सेवन करा यामुळे शरीरामध्ये नवीन चेतना निर्माण होते आणि हाता पायाला येणाऱ्या मुंग्या बंद होतात. 

सध्या संगणकाचे युग आहे या युगामध्ये सतत संगणकावरती काम केल्यामुळे किंवा मोबाईल वरती नेहमी बघितल्यामुळे अथवा घरामध्ये टीव्ही बघितल्यामुळे डोळे नेहमी लाल होतात, अशावेळी दूर्वा खूप फायदेशीर ठरते. दुर्वा वाटायची आणि डोळ्यावरती अर्धातास ठेवायची, त्यामुळे डोळे लाल होणे बंद होते आणि आपल्या चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होतो. 

जर एखादी व्यक्ती अपचन, उलटी, अतिसार या समस्या नेहमी उद्भवत असतील तर त्यांनी दुर्वाचा काढा करून पिल्यास या समस्या नाहीशा होतात. जर आपणास मुळव्याध चा त्रास असेल तर यांचा त्रास सात दिवसात तुम्ही नाहीसा करू शकतात. सात दिवस दुर्वाचा रस पिल्यामुळे मुळ्याचा त्रास बंद होतो.  जर तुम्ही निरीक्षण केल्यास मांजर किंवा कुत्रे त्याचे पोट दुखायला चालू झाले असता ते दूर्वा खातात. 

दूर्वा चे असंख्य फायदे आहेत जर याला गवत न समजता एक औषधी वनस्पती म्हणून संबोधले गेले तर खूप फायदे होते आणि त्यामुळे बऱ्याच रोगांचा समूळ नाश होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button