या मेहंदीच्या कारणामुळे सौंदर्य आणि आरोग्य टिकून राहते

आजकाल सणांमध्ये लग्नसमारंभात व इतर कार्यक्रमांमध्ये मेहंदी ही काढली जाते त्याशिवाय स्त्रियांचं सौंदर्य अपुर असते. आपल्याकडे मेहंदीला एक सौंदर्यप्रसाधन म्हणून बघितल जात.मेहंदी काढणे ही एक कला आहे. तसेच तिचा उपयोग केसांना कलर करण्यासाठी व केसांच्या कंडिशनिंग साठी ही केला जातो. मेहंदीत असलेल्या तिच्या रंगद्रव्यामुळे तिला व्यापारी महत्व आहे. 

मेहंदी आरोग्यासाठी महत्वाची 

मेहंदी मध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणही आहेत मेहंदीच्या खोडाच्या सालीपासून त्वचारोग व कोड यांसारखे आजार बरे करण्याचे ही गुण आहेत मेहंदीच्या साली च्या काड्या पासून आपण मुतखडा ही बरा करू शकतो तसेच तिच्या पानांचा लेप लावून खरचटणे भाजणे त्वचेचा दाह अशा प्रकारचया आजाराला ही बरे करू शकतो.मेहंदीच्या पानांमध्ये वांतिकारक आणि कफोतसारक गुणधर्म आहेत. घसा दुखी असल्यास गुळण्या करताना पाण्या मध्ये मेहंदीचे पाने घातली असता आराम मिळतो. पायांची आग थांबवण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता उत्सर्जित करण्यासाठी व डोकेदुखी थांबवण्यासाठी ही डोक्याला आणि पायाला मेहंदी लावली जाते. 

मेहंदी चा लाल रंग त्यामुळे हातांचेच्या पानांचं चालींचा अर्क बनून घेतल्यास क्षय रोगान सारखे आजार दूर करता येतात.

मेहंदी चा शृंगार करण्यासाठी वापर

मेहंदीच्या फुलातून टिरोझ सारखे द्रव्य प्राप्त होते यालाच मेहंदी किंवा हिना म्हणतात. पूर्वी मेहंदी हाताला लावण्यासाठी पानांना सूकवून त्याची पेस्टबणून ती पेस्ट हाताला गोलाच्या आकाराने काढली जायची हळूहळू त्याचे रूपांतर नक्षीमध्ये झालं पाच-सहा तास चुकल्यानंतर ती काढून टाकली जाते, आणि हातांवर लाल रंग चढतो हळूहळू त्यामुळे हातांचे सौंदर्य अधिक खुलून दिसते हा लाल रंग आपल्याकडे शुभ म्हणून समजले जातो. 

कितीही भरजरी साडी घातली तरी मेहंदी विना हा शृंगार अधुराच वाटतो गुजराती मारवाडी तर वरालाही मेहंदी लावतात. मेहंदी ही हातावर व पायांवरील काढली जाते. मेहंदी लावायची प्रथा आपल्या बरोबरच ती मुस्लिम लोकातही आहे मेहंदी मध्ये काही रोगप्रतिबंध गुणधर्मही आहेत ज्यामुळे वधू-वरांचे संसर्गजन्य रोगांपासून रक्षण होते मेहंदीच्या या सौंदर्याची भुरळ 90च्या शतकापासून पाश्चिमात्य देशातही अधिक प्रचलित होऊ लागली आहे. 

मेहंदी चे प्रकार 

आज कालच्या नवीन युगात मेहंदी काढण्याचे विविध प्रकार आलेले आहेत त्यामध्ये ट्रॅडिशनल मेहंदी, अरेबिक मेहंदी, विंडो अरेबिक मेहंदी, वेस्टर्न अरेबिक मेहंदी, पाकिस्तानी मेहंदी, मोगलाई, सेमी ब्रायडल मेहंदी, ब्रायडल मेहंदी इत्यादी प्रकारे काढली जाते.या प्रत्येक मेहंदी प्रकाराचे माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पुढच्या पोस्टमध्ये पोचण्याचा प्रयत्न करु.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.