हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

by Geeta P
599 views
पानी पिण्याचे फायदे

आपल्या शरीराला पाणी हा घटक अत्यंत आवश्यक असतो. आणि तो घटक आपण योग्य त्या प्रमाणात घेतला  पाहिजे. पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत.

पाणी पिण्याचे फायदे

पाणी पिल्याने कांती सतेज होते. पोट साफ होण्यास मदत होते. सगळेजण आपल्याला भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देत असतात.

पण हे पाणी कसे आणि किती प्रमाणात प्यावे याचे काही नियम आहेत.

दैनंदिन जीवनात आपण जे काही पाणी पीत असतो त्यातील 20 टक्के पाणी हे आपल्या खाण्यातून म्हणजेच पाणी युक्त फळे त्यामध्ये टरबूज, संत्री, किंवा डाळिंब याच बरोबर पालेभाज्या आणि फळे भाज्या  यातून ते आपल्या शरीरात जात असते.

त्याचबरोबर फळांमध्ये आणि पालेभाज्यांमध्ये असणारे विटामिन्स, मिनरल्स किंवा इतरही घटक आपल्याला  मिळत असतात.

त्यामुळे नुसते पाणी न पित राहता फळे खाणे पालेभाज्या खाणे हेही तितकं महत्त्वाचं आहे.

Benefits of Drinking Water
Benefits of Drinking Water

आवश्यक तेवढेच पाणी प्यावे गरजेपेक्षा जास्त पिऊ नये

शरीरातील पाणी कमी पडू नये म्हणून सगळेजण भरपूर पाणी प्या, असा सल्ला देत असतात.

पण जेवढे आवश्यक आहे तेवढेच पाणी प्यायला पाहिजे. पाणी पिण्याचे फायदे

उगीचच तहान नसताना पाणी पीत राहणे योग्य नाही. गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे ही शरीराला घातक ठरू शकते.

त्यामुळे जेव्हा तहान लागेल तेव्हाच पाणी प्या. आणि जेवणानंतर काही वेळाने भरपूर पाणी पिले तरी चालेल.

शरीरात अति पाणी पिल्याने शरीरातील सोडिअमचे प्रमाण कमी होऊ शकते आणि मेंदूवर सूज येऊ शकते. यामुळे चक्कर येणे बेशुद्ध होणे असे प्रकार होऊ शकतात.

पण जर तूम्ही घाम येण्या सारखे काम करत असाल उदा व्यायाम करणे, खेळ खेळणे, चालने अशा वेळी मात्र तुम्हाला भरपूर पाणी प्यावे लागेल.

यावेळी जर तुमच्या शरीराला पाणी कमी पडले तर मात्र नुकसान होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी पिले तर चालते.

Benefits of Betel Leaf विड्याचे पान खाण्याचे फायदे आणि इतिहास

पाणी पिण्याचे फायदे

रात्रीच्या वेळी भरपूर जणांना आपल्या बेड चा बाजूलाच ग्लास भरून ठेवण्याची सवय असते.

नाही तहान लागली तरी उगीच उगीच पाणी पित राहतात पण गरज नसताना पाणी पिले तर रात्री तुम्हाला लघवीला सारखं सारखं उठाव लागेल. आणि त्यामुळे तुमच्या झोपी मध्ये व्यत्यय येईल.

पाणी ग्लास मधूनच प्या प्लॅस्टिक बॉटल मधील नको

काही घरात प्लॅस्टिक बॉटल मध्ये पाणी भरून ठेवायची सवय असते. ऑफिस मध्येही बरेच जण प्लास्टिकच्या बॉटल मधील पाणी पितात.

परंतु हे पाणी शरीराला अपाय कारक ठरू शकते. कारण प्लॅस्टिक मध्ये बिसफेनोल ए हे रसायन असते.

प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरून ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील लठ्ठपणा वाढतो. यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढू शकते.

तसेच स्त्री आणि पुरुष यांच्यातील प्रजनन शक्तीही कमी होऊ शकते. त्यामुळे असे पाणी पिण्याचे टाळावे.

पाण्यात लिंबू टाकून घेणे

कधी कधी नुसत पानी न पिता पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता. कारण लिंबू पानी ने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

त्याच बरोबर तुम्ही लिंबाची गोल चकती करून साली संहित टाकावे आणि प्यावे यामुळे सालीत असणारे Antioxidant घातक द्रव्य बाहेर टाकतात.

आणि तुम्हाला ताजे तवाने वाटते. आणि लिंबात असणारे Vitamin C आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.
 

सकाळी उठल्या पाणी पिण्याचे फायदे

डॉक्टर् किंवा आयुर्वेदाचार्य असाच सल्ला देतात की सकाळी झोपेतून उठल्या उठल्या एक क्लास भरून पाणी प्यायला हवे.

कारण सात ते आठ तास झोपल्या मुळे आपल्या शरीरातील Metabolic अवस्था मंदावलेली असते.

झोपेतही आपली चया अपचय क्रिया चालूच असते. आणि यासाठी पाण्याची गरज असते. पण सात ते आठ तास झोपी मध्ये आपण पाणी पीत नाही.

यासाठी सकाळी उठल्या उठल्या आपल्या शरीराला पाण्याची गरज असते.

अशाप्रकारे या पाणी पिण्याचे फायदे प्रमाणामध्ये आणि वेळेवर पाणी पिऊन तुम्ही आपले शरीर  सुदृढ ठेवू शकता.

Related Posts

Leave a Comment