Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपासून दूर रहा

by Geeta P
1,600 views
Benefits Of Black Raisins

काळे मनुके खा आणि या आजारांना दूर ठेवा

सर्वांनाच उत्तम आरोग्य हवे असते. यासाठी जंक फूड चा वापर टाळावा. आपल्या आहारात फळांचे सेवन करावे. हे उत्तम आरोग्याची पहिली पायरी आहे. 

आज आपण अशाच एका सुक्या मेव्या बद्दल सांगणार आहोत. जो सर्वांचा परिचयाचा आहे. ज्याला आपण काळ्या मनुका असे म्हणतो.

त्याच्या बाह्य रंगावरून त्याचे नाव काळ्या मनुका असे पडलेले आहे . 

Benefits Of Black Raisins
Benefits Of Black Raisins

काळे मनुके

हा मनुका वाळलेल्या सुक्या द्राक्षांपासून बनवलेल्या असतात. उत्कृष्ट चवीच्या या मनुका आपल्याकडे खीर किंवा इतर गोड पदार्थांमध्ये टॉपिंग साठी वापरतात. 

यामध्ये मुळतः शर्करेचे प्रमाण असते. याचे आरोग्यदायी खूप फायदे आहेत. यामध्ये शर्करेचे प्रमाण असल्यामुळे यापासून शरीराला ऊर्जा प्राप्त होते.

यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आणि लोह या पोषक तत्त्वांचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे या शरीराला अत्यंत लाभ देणाऱ्या असतात यात काही शंका नाही.

तसेच मानसिक आणि शारीरिक सामर्थ्य मिळवण्यासाठी मनुका एक चांगले टॉनिक आहे. 

यात असणाऱ्या औषधी गुण धर्मांमुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत होते.

तसेच यात असणाऱ्या पोषण द्रव्यांचा आपल्या सौंदर्यासाठी म्हणजे केसांच्या आरोग्यासाठी त्वचेचा आरोग्यासाठीही तितकाच फायदा होतो. 

हे आहेत सतत पाणी पिण्याचे फायदे Benefits of Drinking Water

असे करावे काळे मनुके यांचे सेवन

काळे मनुके त्यांच्या मूळ रूपात खाल्ल्या तरी त्याचे फायदे होतातच.  परंतु त्या रात्रभर भिजत घालून सकाळी खाल्ल्या तर त्याचा जास्त फायदा होतो. 

कारण त्याचा बाह्य आवरणा मध्ये असणारे खनिजे आणि पोषण द्रव्य पाण्यात मिसळतात त्यामुळे शरीराद्वारे शोषल्या जाणाऱ्या पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते.

काळे मनुके खाण्याने Anemia दूर होतो Benefits Of Black Raisins

ज्याना Anemia आहे त्यांनी मनुका खाणे फायदेशीर ठरते. कारण माणुका मध्ये असणारे लोह हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते. आणि यामुळे अशक्तपणा दूर होतो.

त्यामुळे रोज मूठभर मनुके खल्याने अनेमिया दूर होण्यास मदत होते.

हाय ब्लड प्रेशर

उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या असली तरी त्याचे शरीरावर गंभीर परिणाम दिसून येतात. आणि आपण आजारांना सामोरे जातो.

यामुळे रोज सकाळ संध्याकाळ मुठभर मनुका खाल्ल्याने आपले ब्लड प्रेशर नॉर्मल राहते. 

कारण काळ्या मनुका मध्ये पोटॅशियम असते. तो आपल्या शरीराला आवश्यक घटक आहे.

तसेच सकाळी सकाळी उपाशी पोटी मूठभर काळा मनुका खाल्ल्यास रक्तातील सोडियमचे प्रमाण कमी होते. 

सोडियम हे उच्च रक्तदाबाचे मूळ कारण आहे.  काळ्या मनुका हा यावरील रामबाण उपाय ठरू शकतो. 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त 

वजन कमी करण्यासाठीही काळ्या मनुका उपयुक्त ठरू शकतात.  यात असणारे फायबर पोटात गेल्यास आपल्याला बराच काळ काही खाण्याची गरज वाटत नाही.

सतत पोट भरलेले आहे असे जाणवते तसेच यात असणारे फ्रुक्टोज आणि सुक्रोज आपल्याला बराच काळ अन्नाशिवाय राहू शकते. त्यामुळे डॉक्टरही काळ्या मनुका खाण्याचा सल्ला देतात.

दातांचे किडण्या पासून बचाव आणि संरक्षण

काळे मनुके मध्ये असणारे Oleanolic acid दातांच्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते. हे मनुष्यामध्ये असणारा एक चांगला गुण आहे. 

जो आपल्या दातांचे किडण्या पासून आणि दात खराब होण्या पासून आपले संरक्षण करते.

आपले दात जंतू आणि पोकळी विरुद्ध लढवू शकतात आणि यामुळे जीवाणूंच्या वाडीस प्रतिबंधीत करतात. म्हणूनच रोज काळे मनुके खा आणि आपल्याला दातांचे रक्षण करा. 

हाडांच्या मजबुतीसाठी काळ्या मनुका उपयोगी

काळे मनुके मध्ये असणारे कॅल्शियम आपले हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. कॅल्शियमच्या चांगल्या प्रमाणा बरोबरच यामध्ये बोरॉन देखील असते.

हा घटक आपल्या शरीराला कमी प्रमाणात लागतो, परंतु शरीरात जाणे तेवढेच महत्त्वाचे असते. यामुळे यांना मजबुती मिळते, आणि ताकद ही मिळते.

दृष्टीदोष सुधारतो 

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मनुके चांगले असतात. कारण त्यामध्ये Antioxidant गुणधर्म असतात. ज्यामुळे दृष्टीदोष सुधारतो. आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 

काळे मनुके खाल्याने ताप बारा होऊ शकतो.

काळे मनुके खाल्ल्याने ताप बरा होऊ शकतो कारण यात असंख्य Antioxidant भरपूर प्रमाणात असते त्यामुळे विरुद्ध लढायला मदत करते. हे एक प्रकारचे बूस्ट आहे.

ज्यामध्ये जीवनावश्यक सर्व प्रकारचे घटक आहेत. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते, म्हणून डॉक्टर काळ्या मनुका खाण्याचा सल्ला देतात.

शरीरातील एनर्जी वाढवते 

काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील एनर्जी वाढते म्हणूनच बरेच जण जीमला जाण्याआधी मनुका खाऊन जातात.

जे विशेषतः उन्हाळ्यात बाहेर पडतात अशा विद्यार्थी आणि व्यावसायिक लोकांनी रोज सकाळी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने त्यांच्या शरीराला एनर्जी प्राप्त होते. 

पित्ताचा त्रास कमी होतो 

काळे मनुके खाल्ल्याने शरीरातील पित्ताचा त्रास कमी होतो. पित्त कमी मनुका हा एक नैसर्गिक उपाय आहे यामध्ये असणारे पोटॅशियम, आणि मॅग्नेशियम जे पोट शांत ठेवण्यासाठी मदत करते.

आणि यामुळे पोटात तयार होणारं ज्वालामुखी ही थंड होतो. 

चमकदार त्वचेसाठी उपयुक्त

सर्वांनाच चमकदार आणि तजेलदार त्वचा खूप आवडते. मनुका मध्ये नैसर्गिक गुणधर्म भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपले रक्त शुद्ध करण्यास मदत करते.

आणि त्यामुळे शरीरातील धोकादायक द्रव्य आणि लहान बाहेर टाकण्याचे काम करते . मुरूम , काळे डाग, सुरकुत्या यासारख्या समस्या रक्तशुद्धी मुळे दूर होतात.

त्यामुळे काळे मनुके खाने खूप महत्वाचे होत. आणि यानंतर तुम्ही आपली चमकदार त्वचा अनुभवू शकता.

तर आपल्या आहारात काळे मनुके चा वापर करा आणि असंख्य आजारापासुन दूर रहा Benefits Of Black Raisins

Related Posts

1 comment

6 Benefit of Curry leaves कढीपत्त्याचे असंख्य लाभदायक फायदे | DOMKAWLA 05/08/2021 - 5:49 pm

[…] Benefits Of Black Raisins काळे मनुके खा आणि या आजरांपा… […]

Reply

Leave a Comment