Knowledge

बीयर च्या हिरव्या आणि तपकिरी रंगाच्या बाटल्यांचे रहस्य

बियर म्हणजे काय हे सांगायची आवश्यकता कोणालाच नाही कारण गल्लीतील लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सगळ्यांनाच माहिती असतं, आणि लहान मुलांमध्ये ज्यांना माहीत नसतं त्यांच्या वयाने मोठे असलेले मित्र त्याचे ज्ञान अवगत करून देतात. बिअर पिणे चांगले नाही हे माहित असताना सुद्धा बियर पिल्याने काही होत नाही या गैरसमजात तरुण मंडळी करीत असतात, 

आपण जसा चहा पितो तसा पाश्चात्य देशात बियर पीत असतात, दारू पेक्षाही बिअर स्वस्त असल्यामुळे तरुणाई बिअर च्या विळख्या मध्ये अडकलेली आहे. आणि हा विळखा वरचेवर घट्ट होत चाललेला आहे.तरुण मंडळी कुठेही सर्रास बियर पिताना दिसतात. तरुणांची कुठलीही पार्टी बियर शिवाय पूर्ण होत नाही. 

जर निरीक्षण केल्यास बिअर च्या बाटल्यांचा रंग हा तपकिरी किंवा हिरव्या रंगाचाच असतो, आज आम्ही या पाठीमागचे कारण तुम्हाला सांगणार आहोत, सुरुवातीला बिअर ही काचेच्या बाटलीमध्ये येत असे, पण कालांतराने त्या बिअरचा वास येऊ लागला, आणि त्याची चव पण खराब लागू लागले, त्यानंतर असे लक्षात आले की, सूर्याच्या किरणांमुळे बिअर चा वास आणि त्याची चव खराब होऊ लागली, नंतर त्यावर संशोधन झाले आणि बिअर च्या बाटली चा कलर तपकिरी झाला, त्यामुळे सूर्याची किरणे बिअर पर्यंत पोहोचणे कठीण झाले, आणि बिअर चा वास आणि हे शाबूत राहिली, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर तपकिरी रंगाच्या बाटल्यांची उत्पादन कमी झाले त्यामुळे बिअर चा तुटवडा जाणवू लागला परंतु कंपन्यांनी हिरव्या रंगाच्या बाटल्यांमध्ये बियर उत्पादन चालू केले, त्या बाटल्यांवर विशिष्ट प्रकारच्या कोटिंग चढवून बिअर चे उत्पादन चालू झाले. तेव्हापासून बिअर च्या बाटल्यांचा रंग हा हिरवा किंवा तपकिरी असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button