Bandung Conference of 1955 या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या विमानात टाईमबॉम्ब होता

315 views
Bandung Conference 1955

Bandung Conference 1965 and kashmir princess राजकारण कुठल्या थराला जाईल काही सांगता येत नाही, आज आम्ही अशाच एका इतिहासातील राजकारणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

त्यामध्ये भारताचे नुकसान झालेले आहे. आपले शेजारील राष्ट्र चीन अत्यंत गरीब होते त्या काळातली गोष्ट आहे.

Bandung Conference 1955 बांडुंग कॉन्फरन्स

Bandung Conference 1955

ही कथा आहे 1955 सालाची, इंडोनेशियाच्या जकार्ता मध्ये अशियाई देशांची एक कॉन्फरन्स भरणार होती.

त्या कॉन्फरन्सचे नाव होते बांडुंग कॉन्फरन्स Bandung Conference, सर्व देश नुकतेच स्वतंत्र झालेले होते आणि त्या स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये विकसनशील देश एकत्र करण्या मागे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आटापिटा होता.

या कॉन्फरन्सला चीनकडून त्यांचे पंतप्रधान चाऊ एन लाय हे येणार होते.

पण त्याकाळी चीनची आर्थिक परिस्थिती बिकट होती, कारण चीन सुद्धा नुकताच स्वतंत्र झालेला होता.

जकार्ता ला जाण्यासाठी चीनकडे स्वतंत्र असे विमान नव्हतं, आणि भारताने नुकतेच टाटांच्या एयर इंडिया या कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले होते.

त्यामुळे त्याकाळी भारताकडे अनेक अत्याधुनिक विमाने होती. मग संधी चे औचित्य साधून चीन ने त्यांच्या पंतप्रधानांसाठी एका विमानाची मागणी भारताकडे केली.

कश्मीर प्रिन्सेस Kashmir Princess

Kashmir Princess
Kashmir Princess

मग भारताने मोठ्या भावाप्रमाणे त्यांची मागणी मान्य करून त्यांना इंडोनेशियातील जकार्ता येथे जाण्यासाठी कश्मीर प्रिन्सेस नावाच्या विमानाची सोय केली.

एप्रिल महिन्यातील 11 तारखेला हे विमान हॉंगकॉंग एअरपोर्टवर दाखल झाले. पण पंतप्रधान चाऊ एन लाय त्यांच्या पोटदुखीच्या त्रासामुळे जकार्ता मध्ये बांडुंग कॉन्फरन्स Bandung Conference ला येऊ शकणार नाहीत ही बातमी कळली. 

मग कश्मीर प्रिन्सेस ने पहाटे पाच वाजता उड्डाण घेतले, विमानांमध्ये काही चिनी अधिकारी, चिनी पत्रकार, तर काही इतर देशांचे पत्रकार व प्रतिनिधी होते,

हॉंगकॉंग मधील सेना अधिकारी हे पंतप्रधानाचे मित्र होते तेही या विमानात दाखल होते.

Bandung Conference 1955
Bandung Conference 1955

भारतीय स्टाफ

या विमानात मुख्य पायलट होते कॅप्टन डी.के.जातार, कोपायलट एम.सी.दीक्षित हे होते. इंजिनीयर म्हणून अनंत कर्णिक तर नेव्हीगेटर जे.सी.पाठक हे होते आणि हवाई सुंदरी म्हणून ग्लोरिया बेरी यांची निवड करण्यात आली होती. 

जेव्हा विमान इंडोनेशिया जवळ पोहोचले, तेंव्हा विमानाच्या तिसऱ्या इंजिन मधून धूर येताना दिसला.

मग डी.के.जातार यांची विमान वाचवण्याची खटपट चालू झाली पण ती व्यर्थ ठरली. आणि विमानाचा स्फोट झाला झाला.

कश्मीर प्रिन्सेस चे तीन तुकडे होऊन दक्षिण चिनी समुद्र मध्ये पडले. विमानातील कर्णिक, पाठक आणि दिक्षित हे फक्त तिघे इंडोनेशियाच्या एका बेटाजवळ सापडले.

विमानातील सर्व म्हणजे सोळा जण मारले गेले. 

भारतातील विमान इतिहासा मधील सर्वात मोठी आणि पहिली दुर्घटना होती. चीनी पंतप्रधानांना घेऊन जाणारे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे जगामध्ये खूप मोठी खळबळ माजली होती.

हा झालेला विस्फोट अमेरिकन सीआयए आणि तैवानच्या गुप्तचर संघटनेने घडवून आणला आहे हा आरोप चीन ने लावला.

उत्तर प्रदेश मधील एका शाळा शिक्षिकेने तेरा महिन्यात एक कोटी पगार कमावला ?

पण भारताने आपल्या गुप्तहेर संघटनेकडून माहिती शोधून काढली. तैवानी गुप्तहेरांनी चीनच्या चाऊ एन लाय यांना मारण्यासाठी विमानात टाईमबॉम्ब फिट केला होता.

चिनी पंतप्रधानांची निर्दयता

असं म्हटलं जातं की चीनच्या पंतप्रधानांना या होणाऱ्या विस्फोटाची बातमी अगोदरच माहीत होती म्हणून ते ऐन वेळी विमानामध्ये बसले नाहीत.

या दुर्घटनेत एकूण सोळा जण मारले गेले त्यामध्ये एयरहोस्टेस यांच्या सह खुद्द चायनीज अधिकारी, पत्रकार यांचाही समावेश होता.

शेवटी त्यांनी त्यांचा रंग दाखवून दिला पाषाण हृदयी चिनी पंतप्रधानांनी त्यांनाही वाचवले नाही 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

Related Posts

1 comment

India cha full form kay aahe । What is Full Form of INDIA 17/08/2021 - 2:45 pm

[…] हे हि वाचा या पंतप्रधानांसाठी एअर इंडियाच्या वि… […]

Reply

Leave a Comment