Attaware Edible Cutlery जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

by Geeta P
556 views
Attaware Edible

Attaware edible म्हणजेच आटावेयर कटलरी भांड्या मध्ये जेवण करा आणि नंतर तीच भांडी खाऊन टाका

गव्हाचे पीठ आणि गुळ यांच्यापासून बनवलेली क्रोकरी ज्या मध्ये तुम्ही जेवणपण करू शकता. नंतर ती खाऊ पण शकता.

Attaware edible कटलेरी सुरु करण्या मागचा पुनीत यांचा उद्देश पर्यावरणाचे संवर्धन करणे, गव्हाच्या आणि गुळाच्या शेतकऱ्यांन सोबत जोडून राहणे हा होता.

कधी तुम्ही असे भांडे बघितले आहे का ज्याच्या मध्ये खाता येईल आणि नंतर त्यालाही खाता येईल. ऐकायला हे थोडे किचकट वाटत असले तरी हे खरे आहे.

कारण दिल्ली मध्ये राहणाऱ्या ३६ वर्षीय पुनीत दत्ता यांनी Attaware सोबत स्टार्टअप करून लोकांपर्यंत अशी क्रॉकरी पोहोचवणार आहेत.

ज्यामध्ये एडीबल क्रोकरी, सिंगल युज क्रोकरीचे सस्टेनेबल पर्याय आहे. 

असा झाला टिकटॉक चा भारतामध्ये उगम आणि अंत, एक रोचक प्रवास

Attaware Edible क्रोकरी म्हणजे काय ?

ज्यामध्ये आपण जेवण करून नंतर त्या क्रोकरी चा उपयोग खाण्यासाठी करणे.

जर आपण हे नाही जरी खाल्लं आणि फेकून जरी दिले तरी याचा उपयोग पर्यावरणासाठी होणार आहे. कारण याला जनावराणी खाल्ले तरी त्याचा फायदाच होईल. 

याचे माती मध्ये लँडफील झाले तरी माती मध्ये पोषक द्रव्य मिसळली जातील. आटावेयर कटलरी खूप वेळा लॅब मध्ये टेस्ट केली गेली आहे.

त्या नंतरच गुरु ग्राम मधील एका पबमध्ये हिचा वापर झालेला होता. ही क्रॉकरी सर्व बाजूंनी उपयुक्त आहे अशी जेंव्हा पुष्टी झाली तेव्हाच पुनीत यांनी याचे स्टार्टअप चालू केले. 

हरियाणा मधील फरीदाबाद येथे एका मध्यमवर्गीय परिवारात पुनीत लहानाचे मोठे झाले. 

त्यांना नेहमीच व्यवसायाबद्दल कुतूहल होते. व्यवसाय करावा अशी त्यांची खूप इच्छा होती. पण त्यांचा परिवारा मध्ये व्यवसाया बद्दल एवढे ज्ञान नव्हते. काही अनुभवही नव्हता. 

पुनीत सांगतात की त्यांच्या आयुष्यात नोकरी सन्मान जनक होती. तसेच परिवार ही चांगला होता सगळं संपन्न होत.

पण जेव्हा त्यांनी २०१३ ला वृंदावन ची यात्रा केली तेव्हा त्याचा बघण्याचा दृष्टिकोनच बदला गेला. 

खूप वर्षांपूर्वीचे असफल राहिलेले व्यवसायाचं स्वप्न पुन्हा एकदा त्यांच्या डोळ्यात चमकू लागले.

पण या वेळेस त्यांना हा व्यवसाय स्वतःसाठी करायचा नव्हता तर त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं ज्याच्या तून सगळे प्रेरित होतिल.

आटावेयर कटलरी
आटावेयर कटलरी

Attaware edible बद्दल डोक्यात कल्पना काशी आली ?

त्यांनी असाही एक अनुभव सांगितलं की ज्याच्यामुळे त्यांना करण्याची प्रेरणा मिळाली. ते

म्हणतात की आम्ही जेव्हा यमुना नदी पार करत होतो तेव्हा गाडीतून असे दिसले, की नदीवर काहीतरी पांढऱ्या कलरचे वाहत जात आहे.

वरून तर ते दृश्य खूप छान दिसत होतो पण जेव्हा खाली उतरून पाहिले तेव्हा समजले की ते प्लास्टिक थर्माकोल आहे. 

यानंतर जेव्हा ते वृंदावन मध्ये पोहोचले होते, तेव्हा प्रतेक ठिकाणी भंडार चालू होता. प्लॅस्टिक क्रोकरी चे ढीग साचले होते. 

त्यानंतर काही जाण ओरडत होते प्लॅस्टिक प्लेट संपल्या म्हणून आणि काही जाण तर हातावर पुरी घेऊन त्यावर भाजी ठेऊन खात होते. 

हे सगळ पाहून त्यांचा डोक्यात विचार आला की जर प्लेट्स आशा असतील ज्याना खाल्ले जाईल तर काचराच होणार नाही.

शेवटी त्यांनी त्यांचे रिसर्च चालू केले. आशा काही एडीबल वस्तूंचा आभ्यास केला. जांचा आपन वापर करू शकू.

गव्हाच्या पिठापासून पहिले एक वाटी बनवली. पिठाला आकार देणे तर संभव झाले त्यात मजबूत पना कसा आणणार हा त्याच्यापुढे प्रश्न होता. त्यानंतर त्यांनी यावरही खूप रिसर्च केले. 

नंतर ते कुतुब मिनार बघायला गेले होते.

तिथल्या गाईड लोकांना इमारतीची माहिती देत असताना म्हणाला की भारतात कशाला जुन्या इमारती बांधण्यासाठी त्यात गुळाचा ही वापर केलेला आहे. 

त्यामुळे त्याला मजबुती मिळते. तेव्हा त्यांनी गुळाचा वापर करण्याचे ठरवले आणि यानंतरचे सगळे ट्रॅयल्स त्यांनी पीठ आणि गुळ या वरच केले. 

शेवटी आटावेयर कटलरी बनवण्यामध्ये सफल झाले, त्यांनी याचे सर्व लॅबटेस्ट केलेल्या आहेत.

याप्रकारे सर्व प्रकारच्या पडताळणी नंतर त्यांनी आपले प्रॉडक्ट पेटंट फाईल साठी दिले. 

जेव्हा पेटंट आले तेव्हा त्यांनी ऑगस्ट २०१९ Attaware edible यांच्या सोबत त्यांनी आपले स्टार्टअप सुरू केले.

आटावेयर कटलरी म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवलेले भांडे. पुनीत यांनी पिठापासून कप, ग्लास, कटोरी, चमचे, वेगवेगळ्या आकाराच्या प्लेट्स, पॅकेजिंग कंटेनर बनवले.

यांच्या द्वारा बनवलेल्या या किटमध्ये 64 प्रकारचे प्रोडक्स आहेत.  

या प्रॉडक्टची खासियत आहे हे प्रोडक्ट जैविक आहेत प्राकृतिक आणि खाण्यासाठी योग्य आहेत.

जरी ह्या वस्तूंना खाल्ले नाही तरी या वस्तू तीस दिवसात डी कंपोज् होतात. 

यामध्ये शेतकऱ्यांचा ही फायदा

पुनीत दत्ता पर्यावरण आणि प्रकृती यांच्या सोबतच शेतकऱ्यांनाही आणि बेरोजगार महिलांनाही नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहेत. 

त्यांचे मॉडेल आहे की छोटे शेतकरी ज्यांच्याकडे दोन एकर पेक्षाही कमी जमीन आहे अशांकडून घ्यावे पिक घ्यावे.आणि त्यांचाशी जोडले जावे.

यामुळे त्यांना गहू आणि गूळ मिळवण्यासाठी उस मिळेल आणि शेतकऱ्याला त्यांचा मेहनतीचा पैसा ही मिळेल.

त्यांनी त्यांची फॅक्टरी फरीदाबाद आणि बहादूरगड येथे स्थापित केली आहे.  सध्या त्यांचे प्रयत्न जास्तीत जास्त प्रोडक्शन वर आहे कारण बाजारा मधल्या मागणीची ते पुर्ती करू शकतील. 

Related Posts

Leave a Comment