अवघ्या १४५ रुपायांमध्ये लंडन ते कोलकाता बस ने प्रवास करता येत होता

by Geeta P
307 views

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फेसबूकइंस्टाग्राम

आज आम्ही एका अशा गोष्टीबद्दल सांगणार आहोत ऐकून तुम्हाला खरोखरच आश्चर्य वाटेल. तुम्हाला जर असे सांगितले की भारतातून लंडन ला विमानाने किंवा पाण्यातून बोटीने प्रवास केला असं कोणी सांगितलं तर यात काही आश्चर्य वाटणार नाही परंतु हाच प्रवास जर बसने करता येतो असे सांगितले तर त्याचे नवल नक्की वाटेल.आणि वेड्यात काढल्या सारख वाटेल.  पण हे खरं आहे कारण एकोणिसाव्या शतकात अशी एक बस सेवा सुरू होती याच्यातून प्रवासी भारतातून लंडन ला बस जायची.

पृथ्वीचा व्यास १२ हजार ७४२ किमी ईतका आहे तर कोलकाता ते लंडन हे आंतर ७ हजार ९५७ किमी म्हणजेच पृथ्वीला आरध्या पेक्षा जास्त फेरी ही बस मारत होती.१५ एप्रिल १९५७ मध्ये ही पहिली बस लंडनमधून निघाली.या बसचे नाव अल्बर्ट असे होते.

पहिल्यांदा ही बस १५ एप्रिल १९५७ ला लंडन इथून निघाली आणि ५ जून १९५७ ला कोलकाता येथे येऊन पोहोचली.या बसला लंडनहून कोलकता येथे पोहोचण्या साठी जवळपास ४५ – ५० दिवसांचा प्रवासाचा अवधी लागला.

तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हे खरं आहे का पण अहो ही गोष्ट खरी आहे.त्यावेळेला भारताच्या न्यूज पेपर मध्ये ही बातमी आली होती लंडन ते कोलकाता ही बससेवा सुरू झालेली आहे.

त्यानंतर हे कळले की ही बस सेवा सिडनीतील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून सुरू करण्यात आली होती.

ही बस लंडन ते कोलकाता असा प्रवास करत असताना अनेक देश आहे प्रवास करत यायची त्याचबरोबर या बसची लंडनहून  निघण्याची आणि भारतात पोहोचण्याची तारीख आधीच ठरलेली असायची.

प्रवाशांना प्रवास करत असताना प्रवासात एखादे पर्यटन स्थळ आल्यास तेथे थांबून त्याचा आनंदही घेता येत असे.

बस चा मार्ग

या कारणामुळे या बसला मोठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत होता. हि बस  कोलकता इथून निघाल्यावर ती अमृतसर, वाघा बॉर्डर वरून पाकिस्तानला पोहोचत असेल आणि नंतर तिथून ती लाहोर, काबुल, अफगाणिस्तान हैरान, इराणमधील तेहरान, तुर्की स्थानातील इस्तांबुल, ऑस्ट्रिया, बेल्जियम, असा प्रवास ती लंडन ला पोचत होती आणि त्याच मार्गाने परत येताना दिल्लीत आल्यानंतर आग्रा अलाहाबाद बनारस मार्गे कोलकात्त्याला पोचत होती.

बस मध्ये प्रवास यांची काळजी घेतली जात असे त्यांचा प्रवास कंटाळवाणं होऊ नये म्हणून बस मध्ये कंपनीने रेडिओ सुद्धा लावला होता. ४५ ते ५० दिवसांचा प्रवास आरामदायक होण्यासाठी बस मध्ये फॅन, झोपण्यासाठी वेगळी सुविधा केलेली होती प्रवास आरामदायक आणि आठवणीत राहावा याची खबरदारी ही कंपनी घेत होती

बसच प्रवास तिकीट १९७२ कोलकत्ता ते लंडन या प्रवासासाठी १४५ रुपये इतके होते म्हणजे आजचे जवळपास १३ हजार ६४४ रुपये एवढे होते यामध्ये प्रवाशांना नाष्टा, जेवण आणि राहण्याची  व्यवस्था त्यातच होती, काही काळाने या बसचे तिकीट ३०५ डॉलर इतके करण्यात आले.

albert bus calcutta to london

Related Posts

Leave a Comment